लिहा बु. ग्रामपंचायतीमध्ये सहा जागांसाठी १३ उमेदवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:29 IST2021-01-13T05:29:21+5:302021-01-13T05:29:21+5:30

परिसरात लिहा बु. हे गाव मोठे असून, येथील ग्रामपंचायत निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येथील ग्रामपंचायतीला वेगवेगळ्या पद्धतीने उत्पन्नाचे ...

Write Bu. 13 candidates for six seats in Gram Panchayat | लिहा बु. ग्रामपंचायतीमध्ये सहा जागांसाठी १३ उमेदवार

लिहा बु. ग्रामपंचायतीमध्ये सहा जागांसाठी १३ उमेदवार

परिसरात लिहा बु. हे गाव मोठे असून, येथील ग्रामपंचायत निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येथील ग्रामपंचायतीला वेगवेगळ्या पद्धतीने उत्पन्नाचे चांगले स्त्रोत आहेत. विविध राजकीय पक्षांचे गावातील कार्यकर्ते ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी चांगलेच कामाला लागले आहेत. गत ३ पंचवार्षिकपासून इश्वर पाटील यांच्या पॅनेलचा ग्रामपंचायतीवर विजय होत आला आहे. परंतु यावेळी विजयाचा चौकार रोखण्यासाठी विरोधकांनी सावध भूमिका घेतली आहे. सध्या गावातील सार्वजनिक ठिकाणी निवडणुकीवर विचारमंथन होताना दिसत आहे. उमेदवारासाठी बेरीज व वजाबाकीची आकडेमोड सुरू आहे. लिहा बु. ग्रामपंचायतीची एकूण सदस्य संख्या नऊ आहे. त्यापैकी तीन सदस्य अविरोध आले आहेत. अविरोध आलेले तीनही उमेदवार वॉर्ड क्रमांक दोनमधील आहेत. सध्या ग्रामपंचायतीच्या एकूण सहा जागांसाठी १३ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. सर्व उमेदवार व कार्यकर्ते प्रत्येक घरी जाऊन मतदान मागताना दिसून येत आहेत.

Web Title: Write Bu. 13 candidates for six seats in Gram Panchayat