पाणी पुरवठा अभियंत्यांना महिलांचा घेराव!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 17:08 IST2018-12-29T16:25:51+5:302018-12-29T17:08:27+5:30
खामगाव : ऐन हिवाळ्यातच जाणवत असलेल्या पाणी टंचाईविरोधात बाळापूर फैलातील महिलांनी शनिवारी पालिकेत धडक दिली. यावेळी पाण्यासाठी पाणी पुरवठा अभियंत्यांना घेराव घालण्यात आला.

पाणी पुरवठा अभियंत्यांना महिलांचा घेराव!
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : ऐन हिवाळ्यातच जाणवत असलेल्या पाणी टंचाईविरोधात बाळापूर फैलातील महिलांनी शनिवारी पालिकेत धडक दिली. यावेळी पाण्यासाठी पाणी पुरवठा अभियंत्यांना घेराव घालण्यात आला. शहरातील बाळापूर फैल भागातील नळांना पाणी येत नाही. त्याचवेळी परिसरातील एक हातपंप आटला असून, एक हातपंप नादुरस्त आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी इतरत्र भटकावे लागते. दिवसेंदिवस पाणी समस्या गंभीर होत असल्याने शनिवारी बाळापूर फैलातील महिलांनी थेट पालिकेत धडक दिली. यावेळी पाणी पुरवठा अभियंता निरज नाफडे यांच्यासह पर्यवेक्षक सूरजसिंह ठाकूर यांना महिलांनी घेराव घातला. यावेळी बाळापूर फैल भागातील नगरसेवक गणेश सोनोने या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनाही काही महिलांनी पाण्यासाठी धारेवर धरले. यावेळी उपस्थितांनी तात्काळ पाहणी करून हातपंप दुरूस्त करून देण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे महिलांनी आपले आंदोलन आटोपते घेतले.