महिलेची फसवणूक; गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 00:12 IST2017-10-11T00:09:37+5:302017-10-11T00:12:29+5:30
खामगाव: तुमच्या मुलाने पैसे द्यायचे सांगितले असे म्हणून महिलेचा विश्वास संपादन करून ६ हजार रुपये नगदी घेऊन महिलेची फसवणूक केल्याची घटना मंगळवारी सकाळी साबणे ले-आउट येथे घडली. याप्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

महिलेची फसवणूक; गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: तुमच्या मुलाने पैसे द्यायचे सांगितले असे म्हणून महिलेचा विश्वास संपादन करून ६ हजार रुपये नगदी घेऊन महिलेची फसवणूक केल्याची घटना मंगळवारी सकाळी साबणे ले-आउट येथे घडली. याप्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
शकुंतला सुरेश मते (वय ४८) यांनी शिवाजी नगर पोलीस स्टेशनला तक्रार दिली की, सकाळी ८.४५ वाजतादरम्यान एक ३५ वर्षीय अज्ञात इसम घरी आला व तुमच्या घराच्या बांधकामाच्या विटा घेऊन आलो आहे. तुमच्या मुलाने १0 हजार रुपये देण्याचे सांगितले, असे म्हणून ६ हजार रुपये घेऊन निघून गेला. यावेळी मुलास पैशाबाबत विचारणा केली असता त्याने कोणालाही पैसे घेण्यासाठी पाठविले नसल्याचे समजले. त्यामुळे सदर इसमाने खोटे बोलून विश्वासघात केला व ६ हजार रुपये नगदी घेऊन फसवणूक केली. या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध कलम ४२0 भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे.