दुचाकीवरून पडल्याने महिला गंभीर जखमी
By अनिल गवई | Updated: March 8, 2024 18:28 IST2024-03-08T18:27:54+5:302024-03-08T18:28:52+5:30
खामगाव शेगाव रोडवरील घटना

दुचाकीवरून पडल्याने महिला गंभीर जखमी
अनिल गवई, खामगाव: गतीरोधकावरून दुचाकी उसळून झालेल्या अपघातात एक ४० वर्षीय महिला गंभीर जखमी झाली. ही घटना शुक्रवारी खामगाव शेगाव रोडवरील विद्युत भांडार समोर घडली.
प्राप्त माहितीनुसार जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील चिकनगाव येथील रहिवासी अरूणा हरि तायडे (४०) या दुचाकीने शेगावकडे जात होते. दरम्यान, शेगाव रोडवरील विद्युत भांडार समोरील गतीरोधकावर दुचाकी उसळल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. जखमी अवस्थेत त्यांना त्वरीत खामगाव येथील सामान्य रूग्णालयात भरती करण्यात आले. मात्र, प्रकृती अत्यवस्थ झाल्याने त्यांना त्वरीत अकोला येथील सर्वोपचार रूग्णालयात हलविण्यात आल्याचे सामान्य रूग्णालयातील सुत्रांनी सांगितले.