शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
2
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
3
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
4
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
5
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
6
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
7
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
8
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
9
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
10
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
11
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
12
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
13
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
14
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
15
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
16
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
17
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
18
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
19
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
20
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
Daily Top 2Weekly Top 5

महिलेने बँक अधिकारी असल्याचे सांगून एटीएममधून काढले ७00 रुपये

By admin | Updated: March 4, 2015 01:49 IST

मातोळा येथील घटना.

मोताळा (जि. बुलडाणा) : शहरातील एका स्टेट बँक खातेदाराच्या मोबाइलवर अज्ञात महिला ठगाने फोन करून बँकेची अधिकारी असल्याचे सांगून एटीएम क्रमांक घेऊन एटीएम खात्यातून ७00 रूपये काढून फसवणूक केली. ही घटना सोमवार, २ मार्च रोजी दुपार दरम्यान घडली.मोताळा येथील वार्ड क्रमांक पाचमधील आलम शाह भिकन शाह यांचे स्थानिक स्टेट बँक शाखेत खाते असून, सोमवारी दुपारी येथील स्टेट बँक शाखेजवळून मोताळा फाट्यावर जात होते. दरम्यान, अज्ञात महिला ठगाने ८४८१0२१९१४ या मोबाइल क्रमांकावरून आलम शाह यांच्या ९४0३२५२४२४ या क्रमांकावर फोन करून बँक अधिकारी बोलते, असे भासवून त्यांच्या एटीएमचा १६ अंकी पीन क्रमांक घेतला व सोमवार २ मार्च रोजी दुपारदरम्यान एटीएम खात्यातील ७00 रुपये काढून घेतले. ही बाब आलम शाह यांच्या लक्षात आल्याने त्यांनी लगेचच आलेल्या मोबाइल क्रमांकावर संपर्क केला; परंतु क्रमांक स्विच ऑफ येत गेला. तत्काळ आलम शाह यांनी स्टेट बँक गाठून शाखा व्यवस्थापकाच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. बँकेनी लगेचच त्यांना उर्वरित रक्कम काढून घेण्याचा सल्ला देत, एटीएम कार्ड तत्काळ ब्लॉक करण्याचे सांगितले. आलम शाह यांनी खात्यातील उर्वरित रक्कम काढून एटीएम कार्ड ब्लॉक केले. या प्रक्रिये दरम्यान फसवणूक करणार्‍या ठगाकडून एटीएममधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला गेला; मात्र खात्यात पैसे शिल्लक नसल्याने मोठी रक्कम लांबवण्यापासून आलम शाह वाचले. तालुकाभरात या आगोदरही बँक अधिकारी भासवून खोटे कॉल करून एटीएमचा पीन क्रमांक विचारल्याच्या घटना घडलेल्या आहेत.