महिलाही उतरल्या संपात!
By Admin | Updated: June 7, 2017 00:45 IST2017-06-07T00:45:26+5:302017-06-07T00:45:26+5:30
शेतकरी संपाला ग्रामीण भागातील जनतेचाही उत्स्फूर्त प्रतिसाद

महिलाही उतरल्या संपात!
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आयोजित संपात ग्रामीण भागातूनही सोमवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शेतकऱ्यांसह सामाजिक कार्यकर्ते आणि महिलाही या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
नांदुरा : शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी संप पुकारला असून, नांदुरा तालुक्यातही शेतकरी संपात शेतकऱ्यांसह संपूर्ण समाजघटक सहभागी होत आहेत. सोमवारी सकाळी १० वाजता तालुक्यातील धानोरा, विटाळी, काटी, सिरसोडी येथील महिलाही या संपात सहभागी होत रस्त्यावर उतरल्या. यावेळी शेतकरी, महिला, मुलेबाळे, गुरेढोरे, बैलगाडी ट्रॅक्टरसह या शेतकऱ्यांनी संपूर्ण कर्जमाफीची मागणी करीत सात-बारा कोरा करून देण्याच्या घोषणा केल्या.
राज्यातील शेतकरी सतत तीन वर्षांच्या दुष्काळाने होरपळून निघालेला असूनही शेतकरी वर्गाच्या पेरणीकरिता शासनाकडून कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. कर्ज पुनर्गठनामुळे शेतकरी पीक कर्जात पात्र नाही, त्यामुळे संपूर्ण कर्जमाफी होणे गरजेचे आहे.
लाखनवाडा येथेही बंद यशस्वी
लाखनवाडा : लाखनवाडा येथे शेतकऱ्यांचा बंद १०० टक्के यशस्वी झाला. सोमवारी सकाळी जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त मुख्य अभियंता विजय पांढरे यांच्या नेतृत्वाखाली गावात फिरून बंद पाळण्याचे आवाहन केले असता सर्व लहान मोठ्या व्यवसायिकांनी आपली दुकाने बंद करून उत्तम प्रतिसाद दिला. गावातील सर्व दुकाने बंद असल्यामुळे गावातील सर्व व्यवहार बंद पडली होते. हे सर्व शेतकरी बस थांब्यावर आल्यानंतर शेतकऱ्यांनी कांदे व दूध रस्त्यावर फेकले आणि तेथेच ठिय्या देऊन बसले.
यामध्ये विजय बळवंत पांढरे शिवाजी त्र्यंबक पांढरे, शे. युनुस शे.युसुफ, दत्ता नामदेव बोदडे, संजय रामदास सावळे, भोजराज बाळकृष्ण हटकर, ज्ञानदेव तुकाराम पांढरे, रामदास सुपडू सावळे, अशोक एकनाथ पांढरे, शे.लतीब, कैलास बाबुराव पांढरे, शे.मोबीन शे.महेमुद, विजय बळीराम देशमुख, श्रीकृष्ण महिपत होळकर, उत्तम तुकाराम पांढरे, रंगलाल राघळा पवार आदीसह विविध राजकीय पक्षाचे व संघटनेचे कार्यकर्ते शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
शेतकऱ्यांचा संप
रामनगर : तालुक्यातील रामनगर येथे संभाजी ब्रिगेडच्यावतीने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यात आला. रामनगर येथे संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष रवी महाले यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी रस्त्यावर कांदा फेकला.
यावेळी रास्ता रोको आंदोलनही करण्यात आले. या आंदोलनात विशाल जैन, दीपक फाटे, आत्माराम कावडकार, गोपाल पाचपोर सोपान जुमडे, बाळू आखरे यांच्यासह राम नगर येथील शेतकरी बांधव हजर होते.