Wolf attack on farm laborers; 9 injured | शेतात काम करणाऱ्या मजुरांवर लांडग्याचा हल्ला; ९ जण जखमी

शेतात काम करणाऱ्या मजुरांवर लांडग्याचा हल्ला; ९ जण जखमी

ठळक मुद्देशेतात काम करणाऱ्या मजुरांवर लांडग्याने अचानक हल्ला केला. गावकºयांनी हल्ला करणाºया लांडग्याचा शोध घेऊन या लांडग्याला ठार केले.

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : शेतात काम करणाऱ्या मजुरांवर लांडग्याने अचानक हल्ला केला. ही घटना शुक्रवारी दुपारी १ वाजता दरम्यान खामगाव तालुक्यातील शिराळा येथे घडली. या घटनेतील जखमींना तात्काळ खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रूग्णालयात भरती करण्यात आले.
शिराळा येथील रमेश लधाड (६०)े सराफ यांच्या शेतात काम करीत होते. या दरम्यान अचानक जंगलातून आलेल्या लांडग्याने लथाड यांच्यावर हल्ला चढवुन त्यांना जखमी केले. यानंतर लांडग्याने बाजूच्या शेतात खेळणाºया लहान मुली आणि शेतात काम करणाºया नागरिकांवर हल्ला चढविला. त्यांनाही जखमी केले. यात जखमी झालेल्या रमेश लथाड यांच्यासह आचल साळुखे (८), लक्ष्मी शिंदे (१२), भाग्यश्री मावळे (१६), विशाल शिंदे (१२), रोशनी हटकर (६), आकाश हटकर, दिनकर तायडे (६५), श्रीकृष्ण पंखूले (६०) या ९ जणांना उपचारासाठी येथील सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
याबाबत माहिती मिळताच आ. अ‍ॅड. आकाश पुंडकर यांनी सामान्य रुग्णालयात जावून जखमींची भेट घेवून विचारपूस केली व उपचाराबाबत डॉक्टरांशी चर्चा केली.
गावकऱ्यांनी लाडग्याला केले ठार !
लांडग्याच्या हल्ल्यात ९ जण जखमी झाल्याची वार्ता समजताच संतप्त गावकºयांनी आपला मोर्चा लांडग्याच्या दिशेने वळविला. हल्ला करणाºया लांडग्याचा शोध घेऊन या लांडग्याला ठार केले.

 

 

Web Title: Wolf attack on farm laborers; 9 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.