वन्यप्राण्यांचा धुमाकूळ
By Admin | Updated: August 18, 2014 00:16 IST2014-08-17T23:54:48+5:302014-08-18T00:16:46+5:30
बोथाकाजी परिसरात शेतीपिकांचे नुकसान, वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी.

वन्यप्राण्यांचा धुमाकूळ
बोथाकाजी : परिसरात वन्यप्राण्यांचा धुमाकुळ झाला असून जमीनीवर उगवलेली पिकेच फस्त करण्याचा सपाटा या प्राण्यांनी लावला आहे. त्यामुळे या प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकर्यामधून होत आहे.
बोथाकाजी परिसरात रोही व हरीण या प्राण्यांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. ३0 ते ४0 रोही तर ४0 ते ५0 हरीणांचा कळप याप्रमाणे वन्यप्राण्यांची संख्या वाढतच आहे. सध्या पुरेसा पावसाळा नसल्याने जंगलात खाण्यासाठी गवतही उगवले नाही. तर दुसरीकडे शेतकर्यांनी पेरणी केलेल्या पिकांची पावसाअभावी अगोदरच दयनीय अवस्था झाली असताना असा थेट वन्यप्राण्यांनी शेतात धाव घेतली आहे. परिणामी शेकडो हेक्टरवर या प्राण्यांचा मुक्तसंचार सुरू आहे. शासनाने वन्यप्राण्यांच्या हत्येला बंदी घातल्याने शेतकरी केवळ प्राण्यांना हाकलून देण्याचे काम करीत आहे. मात्र वन्यप्राण्यांची संख्या वाढतच असल्याने किती प्राण्यांना हाकलून द्यावे असा प्रश्न शेतकर्यांना पडला आहे. डोळ्यासमोर वन्यप्राण्यांकडून शेतीचे होत असलेले नुकसान पाहता वनविभागाने या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील शेतकरी बांधवांकडून होत आहे.