पत्नीच्या भाचीचे तयार केले बनावट फेसबुक अकाऊंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:13 IST2021-09-02T05:13:42+5:302021-09-02T05:13:42+5:30

बुलडाणा : पतीशी पटत नाही म्हणून चुलत भावाकडे राहायला आलेल्या एका विवाहितेच्या पतीने चक्क पत्नीच्या भाचीचे फेसबुकवर फेक अकाऊंट ...

Wife's niece created fake Facebook account | पत्नीच्या भाचीचे तयार केले बनावट फेसबुक अकाऊंट

पत्नीच्या भाचीचे तयार केले बनावट फेसबुक अकाऊंट

बुलडाणा : पतीशी पटत नाही म्हणून चुलत भावाकडे राहायला आलेल्या एका विवाहितेच्या पतीने चक्क पत्नीच्या भाचीचे फेसबुकवर फेक अकाऊंट तयार केले. यामध्ये स्वत:च्या मुलाचा आणि पत्नीच्या भाचीचे फोटो अपलोड करून बदनामी केली. याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पत्नीशी पटत नसल्याने आणि तिच्या चुलत भावाने तिला आधार दिल्याने संतापलेल्या पतीने तिच्या या चुलत भावाच्या मुलीचे बनावट फेसबुक खाते उघडले. एवढेच नाही तर स्वतःच्या मुलाचे तिच्यासोबत फोटो टाकून बदनामी केली. हा धक्कादायक प्रकार बुलडाण्यात समोर आला आहे. याप्रकरणी बुलडाणा शहर पोलिसांनी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. राहुल नामदेव वानखडे (रा. वॉर्ड क्र. ३३, संजयनगर, ग्वालटोली, होशंगाबाद, मध्य प्रदेश) असे आरोपीचे नाव आहे. सुंदरखेड भागातील चेतनानगर येथील एका ४३ वर्षीय व्यक्तीने या प्रकरणात तक्रार दिली आहे. त्यांची चुलत बहीण मुलासह त्यांच्याकडे राहते. तिचे पतीशी पटत नाही. राहुलने पत्नीच्या चुलत भावाच्या मुलीचे फेसबुक खाते तयार केले. या अकाऊंटवर मुलीसोबत स्वतःच्या मुलाचे फोटो टाकून या कुटुंबाची बदनामी करणारी पोस्ट टाकली. या तक्रारीवरून शहर पोलिसांनी आरोपीविरुद्ध माहिती तंत्रज्ञान अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक सोळंके करीत आहेत.

Web Title: Wife's niece created fake Facebook account