पत्नीची अश्लिल चित्रफित व्हायरल करणारा गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 13:27 IST2019-12-23T13:27:40+5:302019-12-23T13:27:50+5:30
पहिल्या पत्नीची अश्लिल चित्रफित काढून सोशल मिडीयावर व्हायरल केली होती.

पत्नीची अश्लिल चित्रफित व्हायरल करणारा गजाआड
पिंपळगाव सराई : पत्नीची अश्लिल चित्रफित सोशल मिडीयावर व्हायरल करणाऱ्या पतीस रायपूर पोलिसांनी शुक्रवारी डोंबिवली येथून अटक केली. सन २०१८ पासून हा आरोपी फरार होता.
जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद तालुक्यातील जावखेड येथील एकाने दोन लग्न केली होती. त्याने पहिल्या पत्नीची अश्लिल चित्रफित काढून सोशल मिडीयावर व्हायरल केली होती. विशेष म्हणजे मेहूणीच्या अकाउंटवरुन त्याने क्लिप व्हायरल केली होती. याप्रकरणी २०१८ मध्ये रायपूर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल करण्यात आली होती. मात्र तेंव्हापासून आरोपी फरार होता. पोलिस त्याचा शोध घेत होते. दरम्यान पोलिसांना आरोपीबाबत गुप्त माहिती मिळाली होती. त्याच्या आधारावर रायपूर पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक योगेंद्र मोरे, अमोल गवई यांनी डोंबिवली येथून आरोपीस शुक्रवारी अटक केली. आरोपीस बुलडाणा येथील सायबर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.