विधवेवर बलात्कार; पिता-पुत्र गजाआड
By Admin | Updated: August 13, 2014 00:39 IST2014-08-13T00:39:09+5:302014-08-13T00:39:09+5:30
विधवा महिलेच्या असाह्यतेचा गैरफायदा घेऊन तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी बाप-लेकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल

विधवेवर बलात्कार; पिता-पुत्र गजाआड
चिखली : एका विधवा महिलेच्या असाह्यतेचा गैरफायदा घेऊन तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी बाप-लेकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असून, दोन्ही आरोपींना गजाआड करण्यात आले आहे. तालुक्यातील खैरव येथील एका विधवा महिलेस धमकावून परमेश्वर भास्कर गवई याने तिच्यावर अत्याचार केला होता. याची माहिती परमेश्वरचे वडील भास्कर गवई यास कळाल्यानंतर त्यानेही त्या महिलेस धमकावून तिच्यावर अत्याचार करणे सुरू केले. ७ ऑगस्ट रोजी त्या महिलेस मारहाण केल्याने ती जखमी झाली होती. यापूर्वीही १२ डिसेंबर २0१३ रोजीही सदर महिलेस मारहाण करण्यात आली होती, हे विशेष. दरम्यान याबाबत पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून परमेश्वर गवई व भास्कर गवई या पिता-पुत्राविरूद्ध ३७६, ३२३, ५0४, ५0६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, गजाआड करण्यात आले आहे.