२० हजाराची लाच घेताना भुमिअभिलेख विभागाच्या उपअधिक्षकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 17:24 IST2018-05-04T17:24:17+5:302018-05-04T17:24:17+5:30
येथील भुमी अभिलेख कार्यालयाचे उपअधिक्षक व्ही. व्ही. जाधव यांना २० हजाराची लाच घेतांना लाच लुचपत विभागाच्या पथकाने शुक्रवारी दुपारी रंगेहाथ पकडले.

२० हजाराची लाच घेताना भुमिअभिलेख विभागाच्या उपअधिक्षकास अटक
खामगाव (जि. बुलडाणा) : येथील भुमी अभिलेख कार्यालयाचे उपअधिक्षक व्ही. व्ही. जाधव यांना २० हजाराची लाच घेताना लाच लुचपत विभागाच्या पथकाने शुक्रवारी दुपारी रंगेहाथ पकडले.
अनेक दिवसापासून खामगाव येथील भुमिअभिलेख विभागात नागरिकांची आर्थीक लुट सुरु होती. त्याबाबत अनेकदा तक्रारीही झाल्या होत्या. खामगाव येथील राजु देशमुख यांच्या ले आऊट मधील १९ गुंठेपैकी १२ गुंठ्याचा अहवाल भुमी अभिलेख कार्यालयाने दिला होता. उर्वरीत ७ गुंठे वाढ करण्यासाठी भुमिअभिलेख कार्यालयातील उपअधिक्षक व्हि. व्ही. जाधव यांनी १ लाख ४० हजार रुपयांची मागणी केली होती. दरम्यान राजू देशमुख यांनी या प्रकाराची लेखी तक्रार लाच लुचपत विभागाकडे केली होती. त्यानुसार शुक्रवारी सापळा रचण्यात आला. त्यात उपअधिक्षक जाधव अडकले. त्यापैकी २० हजार रुपयाची लाच घेतांना त्यांना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले.