निवडणुकीच्या ताेंडावर विकास कामाची चाैकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:27 IST2020-12-26T04:27:29+5:302020-12-26T04:27:29+5:30
दुसरबीड : ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना गत पाच वर्षात झालेल्या विकास कामांची चाैकशी सुरू करण्यात आली ...

निवडणुकीच्या ताेंडावर विकास कामाची चाैकशी
दुसरबीड : ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना गत पाच वर्षात झालेल्या विकास कामांची चाैकशी सुरू करण्यात आली आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभागातील अभियंता परदेसी यांनी दुसरबीड येथे २२ डिसेंबर राेजी भेट देऊन चाैकशी सुरू केली आहे.
दुसरबीड येथील सागर देशमुख व इतर ग्रामस्थांनी गावातील विकास कामांमध्ये गैरप्रकार झाल्याची तक्रार केली हाेती. या तक्रारीची दखल घेत घेत जिल्हा परिषदेचे चाैकशी पथक २२ डिसेंबर राेजी गावात दाखल झाले. तसेच गावातील वाॅर्ड क्रमांक एक, वार्ड क्रमांक तीन, वाॅर्ड क्रमांक चारमध्ये झालेल्या कामांची तपासणी जिल्हा परिषदचे कार्यकारी अभियंता परदेशी यांनी केली. जून महिन्यात केलेल्या तक्रारीची चाैकशी निवडणुकीच्या ताेंडावर सुरू केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या चाैकशीत काय समाेर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.