गहु उत्पादक शेतकरी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:30 IST2021-03-14T04:30:32+5:302021-03-14T04:30:32+5:30

ग्रामीण भागात नियमांचे उल्लंघन जानेफळ : परिसरात गत काही दिवसांपासून काेेराेना रुग्णांची संख्या माेठ्या प्रमाणात वाढत आहे. प्रशासनाने काेराेना ...

Wheat growers in crisis | गहु उत्पादक शेतकरी संकटात

गहु उत्पादक शेतकरी संकटात

ग्रामीण भागात नियमांचे उल्लंघन

जानेफळ : परिसरात गत काही दिवसांपासून काेेराेना रुग्णांची संख्या माेठ्या प्रमाणात वाढत आहे. प्रशासनाने काेराेना विषयक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले असले तरी अनेक जण नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे चित्र आहे.

जिल्हा प्रभारीपदी काकड यांची नियुक्ती

देऊळगावराजा : राष्ट्रीय समाज पक्षाच्या बुलडाणा जिल्हा प्रभारीपदी तालुक्यातील अमोल काकड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी ही नियुक्ती केली आहे.

प्रकल्पांतर्गत ३५४ शेतकऱ्यांना लाभ

बुलडाणा : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत चिखली तालुक्यातील मंगरुळ येथील ३५४ शेतकऱ्यांना लाभ मिळाला. जिल्ह्यातील ४१३ गावांमधील शेतकरी या प्रकल्पांतर्गत सुखी, समृद्ध हाेण्यास मदत झाली आहे.

Web Title: Wheat growers in crisis