पश्चिम विदर्भात आयटीआयसाठी ३६ टक्के विद्यार्थ्यांचे प्रमाण घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:38 IST2021-08-28T04:38:49+5:302021-08-28T04:38:49+5:30

दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांचा ओढा विज्ञान, कला, वाणिज्य शाखेकडे सर्वाधिक असतो. परंतू गेल्या काही वर्षापासून औद्योगिक क्षेत्रात निर्माण झालेल्या ...

In West Vidarbha, the number of students for ITIs dropped by 36 per cent | पश्चिम विदर्भात आयटीआयसाठी ३६ टक्के विद्यार्थ्यांचे प्रमाण घटले

पश्चिम विदर्भात आयटीआयसाठी ३६ टक्के विद्यार्थ्यांचे प्रमाण घटले

दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांचा ओढा विज्ञान, कला, वाणिज्य शाखेकडे सर्वाधिक असतो. परंतू गेल्या काही वर्षापासून औद्योगिक क्षेत्रात निर्माण झालेल्या संधीमुळे विद्यार्थी आयटीआयकडे वळले आहेत. परिणामी जागा कमी आणि अर्ज जास्त येत असल्याचे चित्र दरवर्षी पहावयास मिळते. पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्याचे चित्र बघितले असता, मागील वर्षीच्या तुलनेत यंदा अर्ज कमी आले आहेत. परंतू आलेले अर्ज हे जागेपेक्षा जास्तच असल्याने यंदाही अनेक विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित रहावे लागणार आहे.

जागेपेक्षा अर्ज जास्तच

पश्चिम विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती व यवतमाळ जिल्ह्यात मागील वर्षी ६१ हजार ७६६ अर्ज आयटीआयसाठी आले होते. तर यावर्षी ३९ हजार ५९४ अर्ज आलेले आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा अर्ज कमी येऊनही उपलब्ध जागेपेक्षा मात्र या अर्जाची संख्या जास्तच आहे.

जिल्हानिहाय आलेले अर्ज

जिल्हा २०२० २०२१

अकोला ११९९५ ७२२३

अमरावती १६४३३ १०६५०

बुलडाणा १२३६३ ८७८०

वाशिम ६०५७ ४०५३

यवतमाळ १४९१८ ८८८८

Web Title: In West Vidarbha, the number of students for ITIs dropped by 36 per cent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.