शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

मलकापूर तालुक्यातून विहीर चोरीला गेली!

By admin | Updated: June 10, 2015 02:35 IST

हिंगणा काझी शिवारात होती विहीर; ग्रामपंचायतसह जिल्हा प्रशासनही संशयाच्या घे-यात .

बुलडाणा : शासनाच्या ई-क्लास जमिनीवर रोजगार हमी योजनेंतर्गत सन २00६ मध्ये भालेगाव (रण) वासीयांकरिता लगतच्या हिंगणाकाझी शिवारात पिण्याच्या पाण्याच्या विहिरीचे खोदकाम व बांधकाम करण्यास प्रशासकीय मान्यता मिळाली. विहिरीकरिता मंजूर झालेला १ लाख ५३ हजार ६00 रुपयांचा निधीही भालेगाव (रण) ग्रामपंचायतला प्राप्त झाला; पण अद्यापही ह्यत्याह्ण जागेवर विहिरीची निर्मिती न झाल्याने तो प्राप्त झालेला निधी गेला तरी कुठे? तत्कालीन सरपंच व सचिवाने त्या निधीचे काय केले? असे प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित होत आहेत. याप्रकरणी प्रशासनाकडून अपेक्षित असे सहकार्य मिळत नसल्याचीही ओरड होत असून, ग्रामस्थांनी आता विहीर चोरीला गेल्याची तक्रार मलकापूर तहसीलदार यांच्याकडे करीत आंदोलनाचा निर्णय घेतल्याने खळबळ उडाली आहे. भालेगाववासीयांची पाणी समस्या सुटावी, या अनुषंगाने शासनाच्यावतीने रोजगार हमी योजनेंतर्गत पिण्याच्या पाण्याची विहीर खोदकाम व बांधकामकरिता जिल्हाधिकारी बुलडाणा यांचे आदेश क्र.रोहयो/द.प./पिपावी/अका-२/५९७/0६ अन्वये २८ जून २00६ रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात आली. तत्कालीन ग्रामपंचायत सरपंच यांनी रितसर मागणी करून भालेगाव लगतच्या मौजे हिंगणा काझी शिवारातील गट नं.५३ मधील सरकारी जमीनमध्ये विहिरीकरिता १0 गुंठे जमिनीचा प्रस्तावदाखल करण्यासाठी हिंगणा काझी तलाठी यांच्याकडून गट नं.५३ चा ७/१२, नकाशा व नाहरकत आदी कागदपत्रे रितसर मिळवली. भूजल शास्त्रीय सर्वेक्षण विभागांतर्गत सदर गाव परिसराचे सर्वेक्षण करण्यात येऊन गट नं.५३ चा परिसर पाणी लागण्याच्या दृष्टीने योग्य असल्याचे स्थळदर्शक प्रमाणपत्र ग्रामपंचायतला देण्यात आले.