तेजस्वी महाराजांच्या पालखीचे स्वागत
By Admin | Updated: July 28, 2014 00:13 IST2014-07-28T00:07:14+5:302014-07-28T00:13:50+5:30
सिंदखेडराजामध्ये भाविकांची मांदियाळी

तेजस्वी महाराजांच्या पालखीचे स्वागत
मेहकर : सिंदखेडराजा तालुक्यातील वरोडी येथील परमहंस तेजस्वी महाराज यांच्या पालखीचे २६ जुलै रोजी मेहकर शहरात ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. पालखी मेहकर शहरातील प्रमुख मार्गाने रात्री शिवाजी हायस्कूल येथे पोहचली. तेथे वारकर्यांना जेवण देऊन पालखी एमईएस हायस्कूलमध्ये मुक्कामासाठी थांबली. यावेळी जीपमध्ये विराजमान परमहंस तेजस्वी महाराजांचे भाविकांनी दर्शन घेतले.
स्थानिक लोणारवेस चौकात कृउबासच्यावतीने दिंडीचे स्वागत करण्यात आले. यावेळी काँग्रेस कमिटीचे माजी जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव घुमरे, कृउबासचे मुख्य प्रशासक विलास चनखोरे, शहराध्यक्ष अनिल शर्मा, नगरसेवक शे. चाँद कुरेशी, कैलास सुखधाने, शैलेश बावस्कर, डी.जी. गायकवाड, अँड. जगन्नाथ निकस, अँड. शैलेश देशमुख, गजेंद्र माने, गणेश बोचरे, प्रदीप देशमुख, गोविंद महाजन, वामन मोरे, विठ्ठल ठोंबरे, रवी सावजी, स्मित सावजी, बंगाळे, आशाताई झोरे, डॉ.डी.एफ.माल, गजेंद्र गाडेकर यांनी दिंडीचे दर्शन घेतले.
यावेळी संस्थानचे अध्यक्ष श्यामसेठ जाजू, उपाध्यक्ष जानकीराम मानघाले, लक्ष्मणराव गारोळे, काशिनाथ गारोळे, देविदास गुंजकर, श्रीकृष्ण गारोळे, ज्ञानेश्वर गारोळे, विजय गारोळे आदी दिंडीत सहभागी झाले होते. श्रीक्षेत्र वरोडी ते शेगाव पायदळ दिंडीतील वारकर्यांना २७ जुलैला सकाळी महिला महाविद्यालयाजवळ नितीन गारोळे यांच्यावतीने कळण्याची भाकर व ठेचा असा नाश्ता देण्यात येणार आहे. फर्दापूर, गौंढाळा, साब्रा, कंबरखेड, भालेगाव फाटा, नायगाव दत्तापूर, सावत्रा फाटा, मोसंबेवाडी मार्गाने सरस्वती विद्यालय जानेफळ येथे जेवण व मुक्काम होईल.
२८ जुलैला सरस्वती आश्रम देऊळगाव साकर्शा येथे मुक्काम, २९ जुलैला विठ्ठल रुख्मिणी मंदिर तथा भोजने महाराज संस्थानतर्फे अटाळी येथे जेवण व मुक्काम, ३0 जुलैला खामगाव येथे कॉटन मार्केट येथे मुक्काम व वीर हनुमान मंडळ शंकरनगरतर्फे जेवण, ३१ जुलैला शेगाव येथील आनंदसागर विसावा येथे परमहंस तेजस्वी महाराज यांच्या दिंडीचा मुक्काम राहील, अशी माहिती परमहंस तेजस्वी महाराज संस्थान व पंचकमिटी वरोडीच्यावतीने देण्यात आली.