तेजस्वी महाराजांच्या दिंडीचे स्वागत
By Admin | Updated: July 31, 2014 01:29 IST2014-07-31T01:12:20+5:302014-07-31T01:29:56+5:30
वरोडी ते संतनगरी शेगावकडे निघालेल्या पायदळ दिंडीचे खामगाव शहरात ठिकठिकाणी स्वागत.

तेजस्वी महाराजांच्या दिंडीचे स्वागत
खामगाव : श्री क्षेत्र वरोडी ते संतनगरी शेगावकडे निघालेल्या परमहंस तेजस्वी महाराजांच्या सुमारे २ हजार भाविकांचा सहभाग असलेल्या पायदळ दिंडीचे शहरात ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. तेजस्वी महाराजांचेही यावेळी भक्तगणाकडून दर्शन घेण्यात आले. सिंदखेडराजा तालुक्यातील वरोडी येथून २६ जुलै रोजी प्रस्थान झालेल्या तेजस्वी महाराजांची पायदळ दिंडी मार्गक्रमण करीत शेगावकडे निघालेली आहे. २५ जुलै रोजी अटाळी येथे संत भोजने महाराजांच्या पावन भुमीत दिंडी मुक्कामी होती. आज सकाळीच अटाळी येथून प्रस्थान होवून विहीगाव, रामनगर, आवार, टेंभुर्णा मार्गे दिंडीचे शहरात सायंकाळीआगमन झाले. तत्पुर्वी आवार येथे दिंडीतील भक्तगणासाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. टेंभुर्णा फाटा, बाळापूर बायपास, टिळक पुतळा, मेनरोड, जगदंबा चौक, अग्रसेन चौक, शहर पोलीस स्टेशन, नांदुरा रोड, बसस्टॅण्ड चौक ते परत टिळक पुतळा मार्गे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात पालखी मुक्कामी होती.