लग्नात हाणामारी; २२ जणांविरुद्ध गुन्हा
By Admin | Updated: May 6, 2017 02:34 IST2017-05-06T02:34:19+5:302017-05-06T02:34:19+5:30
रायपूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.

लग्नात हाणामारी; २२ जणांविरुद्ध गुन्हा
पिंपळगाव सैलानी : लग्नाचे आमंत्रण दिले नाही म्हणून माळशेंबा येथे ४ मे रोजी लग्नात दोन गटामध्ये हाणामारी झाली असून, परस्परांविरुद्ध तक्रारीवरून २२ जणाविरुद्ध रायपूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.
चिखली तालुक्यातील माळशेंबा येथे ४ मे रोजी रात्री फिर्यादी अंकुश उत्तराव डहाळे राहणार माळशेंबा यांच्या चुलत पुतणीचे लग्न समारंभाचे जेवणाची पंगत सुरु असताना लग्नाचे निमंत्रण का दिले नाही? दारुबंदीबाबत गावामध्ये ठराव घेतल्याच्या कारणावरून गैरकायद्याची मंडळी जमवून जेवणाच्या पंगतीत हातामध्ये तलवार, काठय़ा, सळई घेऊन फिर्यादीचे भावास व नातेवाईकास आरोपी विष्णू पवार, प्रदीप पवार, अशोक पवार, रामेश्वर पवार, एकनाथ पवार, प्रमोद पवार, नाना पवार, प्रशांत पवार, योगेश पवार, शरद पवार, रितेश पवार, पवन पवार राहणार सर्व माळशेंबा यांनी मारहाण करून जखमी केले.
यावरून सदर आरोपीविरुद्ध कलम १४३, १४७, १४९, ३२४ भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच सचिन प्रदीप पवार राहणार माळशेंबा यांच्या तक्रारीवरून आरोपी शेषराव डहाळे, भारत डहाळे, एकनाथ डहाळे, गणेश डहाळे, सुभाष डहाळे, ज्ञानेश्वर डहाळे यांच्यावर कलम १४३, १४७, १४८, १४९, ३२४ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला याचा पुढील तपास ठाणेदार जे.एन. सैयद, पोहेकाँ शिवानंद वीर करीत आहेत.