बुलडाणा जिल्ह्यात तीन मध्यम प्रकल्पांचा जलसाठा शंभर टक्क्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2019 03:38 PM2019-09-06T15:38:11+5:302019-09-06T15:38:19+5:30

जिल्ह्यातील पलढग, ज्ञानगंगा आणि मस हे मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत.

Water storage of three medium projects in Buldana district at 100% | बुलडाणा जिल्ह्यात तीन मध्यम प्रकल्पांचा जलसाठा शंभर टक्क्यांवर

बुलडाणा जिल्ह्यात तीन मध्यम प्रकल्पांचा जलसाठा शंभर टक्क्यांवर

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जिल्ह्यात आतापर्यंत ५३७.६ मिमी सरासरीच्या तुलनेत ८० टक्के पाऊस झाला आहे. गत दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे जलसाठ्यातही वाढ झाल्याचे दिसून येत आहे. पलढग, ज्ञानगंगा आणि मस हे मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. जिल्ह्यातील एकूण ९१ प्रकल्पांमध्ये २२३.९२ दलघमी साठा आहे.
पावसाळ््याच्या तीन महिने उलटल्यांतर संग्रामपूर, बुलडाणा, शेगाव, मलकापूर, जळगाव जामोद तालुक्यात पावसाने आतापर्यंत दमदार हजेरी लावलेली आहे. मात्र मराठवाड्यालगतच्या देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, लोणार आणि मेहकर तालुक्यात मात्र अपेक्षीत पाऊस पडलेला नाही. त्यामुळे येथील स्थिती अजूनही चिंताजनक आहे. ५ सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासात जिल्ह्यात ३.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यात प्रामुख्याने सिंदखेड राजा तालुक्यात १२.७ मिमी, मेहकर १०.८, चिखली तालुक्यात ४.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
दुसरीकडे बुलडाणा जिल्ह्यात वार्षिक सरासरी ६६७.८ मिमी पाऊस पडतो. त्या तुलनेत सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यात सरासरी ५३७.६ मिमी पावसाची नोंद झाली असून, त्याची टक्केवारी ही ८०.४९ टक्के आहे. संग्रामपूर तालुक्यात ११४.४७ टक्के, मलकापूर ९७.९० टक्के, शेगाव ९६.७७, बुलडाणा तालुक्यात ९५.६८ टक्के, जळगाव जामोद तालुक्यात ९५.०१ टक्के, चिखली ७४.२७ टक्के, देऊळगाव राजा ५४ टक्के, सिंदखेड राजा ६७.३० टक्के, लोणार ५५.१३ टक्के, मेहकर ६०.८८ टक्के, खामगाव ७५.३० टक्के, नांदुरा ८७.३७ टक्के, मोताळा ७८.७१ टक्के पाऊस पडला आहे. एकंदरीत गतवर्षीच्या दुष्काळाच्या सावटातून बाहेर पडण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात तुलनेने चांगला पाऊस पडला असला तरी मोठा पेनटाकळी प्रकल्प वगळता अन्य प्रकल्पांमध्ये अपेक्षीत असा जलसाठा झालेला दिसत नाही. मध्यम प्रकल्पांपैकी पलढग, ज्ञानगंगा आणि मस हे प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. मात्र नळगंगा व खडकपूर्णा हे मोठे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी जिल्ह्यात अद्यापही दमदार पावसाची गरज निर्माण झाली आहे.
 
मोठ्या प्रकल्पांमध्ये ३२ टक्के जलसाठा
जिल्ह्यात एकूण ९२ प्रकल्प आहेत. त्यापैकी मोठे प्रकल्प तीन, मध्यम प्रकल्प सात व लघू प्रकल्प ८१ आहेत. त्यापैकी मोठ्या तीन प्रकल्पांमध्ये सध्या ३२.४१ टक्के जलसाठा आहे. नळगंगा, पेनटाकळी व खडकपूर्णा या तीनही मोठ्या प्रकल्पांचा सकल्पीत साठा २२२.६९ दलघमी असून सध्या १८.७२ दलघमी जलसाठा आहे.

Web Title: Water storage of three medium projects in Buldana district at 100%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.