बुलडाणा तालुक्यात ४३ गावांमध्ये पाणीटंचाई
By Admin | Updated: April 6, 2017 01:01 IST2017-04-06T01:01:44+5:302017-04-06T01:01:44+5:30
बुलडाणा तालुक्यातील २०१६- १७ च्या पाणीटंचाई कृती आराखड्यात समाविष्ट असलेल्या ४३ गावांमध्ये प्रशासनाने पाणीटंचाई जाहीर केली आहे.

बुलडाणा तालुक्यात ४३ गावांमध्ये पाणीटंचाई
३५ खासगी विहिरींचे अधिग्रहण
बुलडाणा : पाणीटंचाईचे चटके जिल्ह्याला बसणे सुरू झाले आहे. त्याला बुलडाणा तालुकाही अपवाद नाही. बुलडाणा तालुक्यातील २०१६- १७ च्या पाणीटंचाई कृती आराखड्यात समाविष्ट असलेल्या ४३ गावांमध्ये प्रशासनाने पाणीटंचाई जाहीर केली आहे. या गावांमध्ये पाणीटचाई निवारणार्थ विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.
बुलडाणा तालुक्यात ४३ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणार्थ विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. पाणीटंचाईच्या कृती आराखड्यामध्ये समाविष्ट असलेल्या या गावांमध्ये पाणीटंचाई घोषित करण्यात आली आहे. त्यापैकी २४ गावांमध्ये ३५ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. तसेच हनवतखेड, म्हसला बु., हतेडी खु., डोंगर खंडाळा, पळसखेड नागो, पळसखेड नाईक, घाटनांद्रा, दत्तपूर, बिरसिंगपूर, गिरडा, हनवतखेड, जांब, पाडळी, उमाळा, केलवड, ढासाळवाडी, गिरडा गाव, माळविहीर व रायपूर या गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे, असे उपविभागीय अधिकारी, बुलडाणा यांनी कळविले आहे.