पाणपाेई भागवते तहान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:34 IST2021-03-18T04:34:50+5:302021-03-18T04:34:50+5:30

- A धाड : येथील युवा सामाजिक कार्यकर्ते इमरान पठाण यांनी स्टेट बँक चौकात लावलेल्या पाणपाेईमुळे अनेकांची तहान भागत ...

Water quenches thirst | पाणपाेई भागवते तहान

पाणपाेई भागवते तहान

- A

धाड : येथील युवा सामाजिक कार्यकर्ते इमरान पठाण यांनी स्टेट बँक चौकात लावलेल्या पाणपाेईमुळे अनेकांची तहान भागत आहे.

इमरान पठाण हे मागील दोन वर्षांपासून स्टेट बँक चौकात सर्वसामान्य नागरिकांची तहान भागविण्यासाठी स्वखर्चाने पाणपोई लावण्याचा उपक्रम राबवून सामाजिक दायित्व पार पाडत आहेत. या ठिकाणी ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक बँकेच्या कामासाठी येतात तर तसेच ये-जा करणाऱ्या वाटसरूंनाही पाणपोईवर पाणी मिळत असल्याने त्यांची तहान भागविल्या जात आहे. परिणामी इमरान पठाण यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक होत आहे. या उपक्रमात धाड येथील नागरिकांनी सहभाग घेतला आहे तर दिवसभर असंख्य नागरिकांना थंडगार पिण्याचे पाणी मिळत असल्याने सामान्य नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

Web Title: Water quenches thirst