शेतामध्ये पाणी साचून पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2016 00:16 IST2016-08-10T00:16:55+5:302016-08-10T00:16:55+5:30

पावसामुळे सिंदखेड तालुक्यात पिकांचे नुकसान झाले.

Water damage the crops in the field | शेतामध्ये पाणी साचून पिकांचे नुकसान

शेतामध्ये पाणी साचून पिकांचे नुकसान

राहेरी बु. (जि. बुलडाणा), दि. ९ : येथील जास्त पाऊस झाल्यामुळे या शे तकर्‍याच्या २0 ते २५ एकर शेतामध्ये पाणी साचून तलावाचे स्वरुप आले आहे. त्यामुळे पीकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होत आहे.
राहेरी बु. येथील शेतकर्‍यांनी ४ ऑगस्टला सिंदखेडराजा तहसिल कार्यालयाला एका निवेदनाद्वारे यासंदर्भात माहिती दिली. यावर्षी जास्त पाऊस झाल्यामुळे बर्‍याच शेतकर्‍यांच्या शेतामध्ये पाणी साचून पिकाचे नुकसान झाले. शिवाय शेतजमीन गावाजवळ असल्यामुळे गावातील सांडपाणी व पावसाचे पाणी या शेतामध्ये साचत आहे. त्यामुळे संतोषराव देशमुख, आनंद देशमुख, गजानन देशमुख, दादाराव गवई, तुकाराम रगड, संजय रगड, रविंद्र देशमुख, कचरु गवई, लक्ष्मण गवई, सज्रेराव देशमुख, साहेबराव देशमुख, अविनाश देशमुख, किसनराव सरनाईक, अशोकराव देशमुख, बालासाहेब देशमुख, पंढरीनाथ देशमुख, मनोज देशमुख या शेतकर्‍यांच्या शेतामध्ये पाणी साचून पिकांचे नुकसान होत आहे. याबाबत या शे तकर्‍यांनी ग्रामपंचायतला तक्रार केली आहे. तहसिलदार सिंदखेडराजा व संबंधि तांनी हा प्रश्न मार्गी लावावा व पाण्याची विल्हेवाट लावून शेतीचे होणारे नुकसान थांबवावे, अशी मागणी होत आहे .

Web Title: Water damage the crops in the field