बुलडाणा जिल्ह्यात अवकाळी पावसाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 11:54 AM2021-02-15T11:54:19+5:302021-02-15T11:54:35+5:30

Warning of unseasonal rains in Buldana district १७ आणि १८ तारखेला अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. 

Warning of unseasonal rains in Buldana district | बुलडाणा जिल्ह्यात अवकाळी पावसाचा इशारा

बुलडाणा जिल्ह्यात अवकाळी पावसाचा इशारा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जिल्ह्यात येत्या १७ आणि १८ तारखेला अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता जिल्हा कृषी हवामान केंद्राच्या वतीने नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राचा हवाला देत व्यक्त करण्यात आली आहे. 
विदर्भात प्रामुख्याने हा अवकाळी पाऊस पडणार असून, मध्यम ते हलक्या स्वरूपाचा हा पाऊस राहण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे हा पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. फार जोरदार नसला, तरी मध्यम ते हलक्या स्वरूपाच हा पाऊस राहणार असल्याचे जिल्हा कृषी हवामान केद्रातील तज्ज्ञ मनेश यदुलवार यांनी स्पष्ट केले आहे. दुसरीकडे अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी त्यांची शेतात परिपक्व झालेली तूर काढली असेल, तर ती सुरक्षीत स्थळी हलवावी, तसेच लवकर पेरलेला हरभरा काढणीस आला असल्यास किंवा काढला असल्यास तोही पावसापासूनच्या बचावासाठी सुरक्षित स्थळी हलविण्यात यावा, असे आवाहन जिल्हा कृषी हवामान केंद्राने केले आहे. दुसरीकडे हवामान खात्याने दोन दिवस अवकाळी पावसाचा इशारा दिला असला, तरी १४ फेब्रुवारी रोजीही बुलडाणा जिल्ह्यात ढगाळ वातावरण दिसून आले. 
दरम्यान बुलडाण्यात जिल्हा कृषी हवामान केंद्र गेल्या दोन वर्षांपासून सुरू झाले असून, बुलडाणा जिल्ह्यातील जवळपास १८ हजार शेतकऱ्यांना आता नियमित स्वरूपात आठवड्यातून  दोन दिवस हवामानाचा अंदाज व पिकांसंदर्भात एसएमएसद्वारे मार्गदर्शन करण्यात येते.
अवकाळी पावसाची शक्यता पाहता शेतकऱ्यानी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.
 

Web Title: Warning of unseasonal rains in Buldana district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.