नागझरी येथील शेतकऱ्यांचा उपाेषणाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:37 IST2021-09-25T04:37:44+5:302021-09-25T04:37:44+5:30

उपविभागीय अधिकारी मेहकर यांना दिलेल्या निवेदनात अल्प भूधारक शेतकरी भानुदास प्रभाकर देवकर व श्याम भागवत देवकर यांनी म्हटले आहे ...

Warning of fasting of farmers in Nagzari | नागझरी येथील शेतकऱ्यांचा उपाेषणाचा इशारा

नागझरी येथील शेतकऱ्यांचा उपाेषणाचा इशारा

उपविभागीय अधिकारी मेहकर यांना दिलेल्या निवेदनात अल्प भूधारक शेतकरी भानुदास प्रभाकर देवकर व श्याम भागवत देवकर यांनी म्हटले आहे की, नागझरी गट नं. १० व १२ मध्ये पावसाचे पाणी रोडवरील नालीत साचत असल्याने शेताचे नुकसान होत आहे. शेत पिके व शेती वाहून जात आहे. याबाबत संबंधित विभागाकडे बराच पत्रव्यवहार केला; मात्र न्याय मिळाला नाही. आम्ही अल्प भूधारक शेतकरी असल्याने आमच्याकडे दुसरे उत्पन्नाचे साधन नाही. २७ जुलै २०२० रोजी नायब तहसीलदार वैशाली जायगुडे यांच्या कोर्टात हे प्रकरण दाखल केलेले आहे. मात्र अद्याप निकाल नाही. विनाकारण या प्रकरणात टाळाटाळ होत आहे. तेव्हा न्याय न मिळाल्यास २७ सप्टेंबरपासून उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी दिला आहे.

Web Title: Warning of fasting of farmers in Nagzari