शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
4
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
5
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
6
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
7
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
8
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
9
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
10
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
11
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
13
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
14
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
15
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
16
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
17
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
18
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
19
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
20
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
Daily Top 2Weekly Top 5

स्थलांतरीत होणारी वानखेडची जगदंबा माता

By admin | Updated: January 11, 2017 17:52 IST

देवीच्या एकाच मूर्तीची दोन मंदिरात स्थलांतराची अनोखी परंपरा येथे जोपासली जाते. नदीच्या अ‍ैल व पैल अशा दोन तिरावर या मंदिरांची स्थापना करण्यात आली

- वासुदेव दामधर/ऑनलाइन लोकमत
 
वानखेड (ता.संग्रामपूर), दि. 11 - देवीच्या एकाच मूर्तीची दोन मंदिरात स्थलांतराची अनोखी परंपरा येथे जोपासली जाते. नदीच्या अ‍ैल व पैल अशा दोन तिरावर या मंदिरांची स्थापना करण्यात आली आहे. या पैकी गावाबाहेरील मंदिरात जगदंबा मातेचे महिनाभरासाठी  वास्तव्य राहते.  तर एक महिन्यानंतर पुन्हा देवीची स्थापना नदीच्या पलिकडील तीरावर म्हणजेच गावात केली जाते. या स्थलांतराला देवीच्या सासर-माहेराची संकल्पना दिल्या जाते. ही अनोखी परंपरा येथे वर्षानुवर्षांपासून जोपासल्या जात आहे.
सातपुड्याच्या कुशीतुन उगम पावलेल्या वाननदी तिरावर संग्रामपूर तालुक्यातील वानखेड हे गाव वसले आहे. या गावाचे आराध्य दैवत असलेल्या जगदंबा मातेचे नदीच्या दोन्ही तिरावर दोन पुरातन मंदिर आहेत. यामध्ये  पैलतिरावर असलेले मंदिर हे हेमाडपंथी आहे. शिवाजी महाराजांना प्रसन्न असलेल्या तुळजाभवानीची प्रतिमुर्ती येथे विराजमान आहे. मुळ पिठाच्या तिन्ही मुर्ती माता जगदंबेच्या रुपाने वानखेड येथील मंदिरात विराजमान आहेत. या मंदिरासमोर महाद्वार असून महाद्वारालगत मातेचा दुमजली रथ ठेवण्याची जागा आहे. एका आख्यायिकेनुसार देवीच्या मूर्ती या पैलतिरावरील मंदिरात होत्या.  शिवकाळातील शक्ती उपासक अमृतराव देशमुख यांच्या स्वप्नात येवून प्रतिस्थापनेची आज्ञा श्री. जगदंबा मातेकडून झाली.  त्यानंतर सद्यस्थित असलेल्या गावातील मंदिरात गावकºयांचे वतीने त्रयमुर्तीची पुन्हा स्थापणा, प्राण प्रतिष्ठा करण्यात आल्याचा इतिहास सर्वश्रृत आहे.  वानखेड येथील जगदंबा मातेच्या मंदिरात अनेक उत्सवापैकी दोन उत्सव अति हर्षोउल्हासात साजरे करण्यात येतात. यापैकी पहिला उत्सव म्हणजे नवरात्र उत्सव होय. संपुर्ण महाराष्ट्रातून श्रध्दाळू भावीक मातेच्या दर्शनासाठी येतात. घटस्थापनेपासून अष्टमी पर्यंत दररोज मंदिरात विविध कार्यक्रमाची रेलचेल राहते. पुर्वापार ओव्या म्हणण्याचा जुना प्रघात इथे आजतागत चालु आहे. 
 
पौष पोर्णिमेचा महत्वाचा उत्सव
वानखेड येथील दुसरा उत्सव म्हणजे पौषपौर्णीमेचा मातेचा यात्रोत्सव.  पौष पौर्णीमेला सकाळी मातेला अभिषेक आरती होवून देवीच्या मुर्तीची संपुर्ण गावातून वाजत गाजत मिरवणूक म्हणजे पालखी निघते. या पालखीच्या दर्शनासाठी हजारो भावीक वानखडे येथे येतात. याच दिवशी रात्री बारा वाजता प्रभुरायचंद्राचा रथ संपुर्ण गावातुन निघून सिताहरण, रामायण युध्द व भरतभेट  असा संपुर्ण रामायणावर आधारित कार्यक़्रम सादर केला जातो. दुसºया दिवशी दहीहांडी व महाप्रसादाचा भव्य असा कार्यक्रम पुर्वापार पासून चालत आलेला आहे.
 
जगदंबा मातेच्या स्थलांतराची अनोखी परंपरा वानखेड येथे गेल्या अनेक वर्षांपासून राबविण्यात येते. महाराष्ट्रात स्थलांतराची एकमेव परंपरा वानखेड येथे सुरू आहे. गावातील नागरिकांसह महाराष्ट्रातील भाविक येथे मोठ्यासंख्येने येतात.
- आनंदराव देशमुख
अध्यक्ष,जगदंबा देवी संस्थान, वानखेड.