मेहकर शहरात इमारतीची भिंत शेजारच्या घरावर कोसळली; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 11:00 IST2019-09-20T08:45:19+5:302019-09-20T11:00:36+5:30
घरात झोपलेले शेख आसिफ शेख अश्रफ कुरेशी, शाइस्ता बी शेख असिफ कुरेशी व फैजान या तिघांचा जागीच मृत्यू झाला.

मेहकर शहरात इमारतीची भिंत शेजारच्या घरावर कोसळली; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू.
मेहकर: शहरातील इमामबाडा परिसरात मुसळधार पावसामुळे इमारतीची भिंत शेजारच्या घरावर कोसळल्याची घटना 20 सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. मेहकर शहर परिसरात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. स्थानिक इमामबाडा चौकात शेख जाफर शेख बाबा यांची जुनी इमारत असून रात्री मुसळधार पाउस असल्याने जुन्या इमारतीची भिंत शेजारच्या एका घरावर पडली. त्या घरात झोपलेले शेख आसिफ शेख अश्रफ कुरेशी, शाइस्ता बी शेख असिफ कुरेशी व फैजान या तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर शेख तय्यब शेख अश्रफ कुरेशी, ताहेर शेख दशरथ कुरेशी व शेख जुनेद शेख असिफ हे तिघे मातीच्या ढिगाऱ्याखाली नागरिकांनी त्यांना सुखरूप बाहेर काढले. ते तिघे जखमी झाले आहेत.