नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:30 IST2021-03-14T04:30:54+5:302021-03-14T04:30:54+5:30
बीबी परिसरात १८ फेब्रुवारी राेजी झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले हाेते. याविषयी ‘लाेकमत’ने वृत्त प्रकाशित ...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा
बीबी परिसरात १८ फेब्रुवारी राेजी झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले हाेते. याविषयी ‘लाेकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर त्याची दखल घेत बीबी मंडलातील महसूल कर्मचारी, तलाठी, कृषी सहायक, सरपंच, ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यासह प्रत्यक्ष शेतात जाऊन शेतकऱ्यांसमक्ष नुकसानीची पाहणी केली हाेती.
खरीप हंगामात साेंगणीला आलेल्या साेयाबीन पिकाचे पावसामुळे माेेठ्या प्रमाणात नुकसान झाले हाेते. या नुकसानातून सावरत शेतकऱ्यांनी रब्बी पिकांची पेरणी केली हाेती. मात्र, गारपिटीमुळे साेंगणीस तयार असलेल्या पिकांचे नुकसान झाले. बीबी, मांडवा येथील परिसरात रब्बी पिकाचे व भाजीपालावर्गीय पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाने लवकरात लवकर अहवाल सादर करून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करावेत, अशी मागणी शेतकरी करीत असून, मदतीची प्रतीक्षा करीत आहेत.