वाघजाळ धामणगाव बढे रस्त्याची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:27 IST2021-05-30T04:27:26+5:302021-05-30T04:27:26+5:30

या रस्त्याच्या तातडीच्या दुरुस्तीची मागणी नागरिक करीत आहेत़ यासाठीच एक निवेदन धामणगाव बढे ग्रामपंचायतीचे सदस्य ॲड. वसीम ...

Waghjal Dhamangaon Badhe road condition | वाघजाळ धामणगाव बढे रस्त्याची दुरवस्था

वाघजाळ धामणगाव बढे रस्त्याची दुरवस्था

या रस्त्याच्या तातडीच्या दुरुस्तीची मागणी नागरिक करीत आहेत़ यासाठीच एक निवेदन धामणगाव बढे ग्रामपंचायतीचे सदस्य ॲड. वसीम कुरेशी व नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागास दिले आहे.

मागील तीन वर्षांपासून या रस्त्याची दुरुस्ती फक्त कागदोपत्री झाली, प्रत्यक्षात मात्र रस्त्यावर खड्डे तसेच आहेत.

या रस्त्यावरचा प्रवास वाहन चालकांना जीवघेणा ठरत आहे. विदर्भ, मराठवाडा, तसेच खान्देशला जोडणारा हा रस्ता असून, या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दररोज वाहतूक होत असते.

खराब रस्त्यामुळे नियमित अपघात येथे घडत असतात. सार्वजनिक बांधकाम विभाग निमित्ताने दुरुस्तीचा फार्सकरिता आहे.

परंतु, प्रत्यक्षात मात्र रस्त्याचे काम होत नाही. या रस्त्याच्या तातडीच्या दुरुस्तीची मागणी वसीम कुरेशी व नागरिकांनी केली आहे.

Web Title: Waghjal Dhamangaon Badhe road condition