वरखेडला ग्रामस्वच्छता मूल्यमापन समितीची भेट

By Admin | Updated: December 7, 2015 02:19 IST2015-12-07T02:19:45+5:302015-12-07T02:19:45+5:30

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत केली पाहणी.

Visit of Village Cleanliness Appraisal Committee to Varakhhed | वरखेडला ग्रामस्वच्छता मूल्यमापन समितीची भेट

वरखेडला ग्रामस्वच्छता मूल्यमापन समितीची भेट

वरखेड (जि. बुलडाणा): चिखली तालुक्यातील वरखेड येथे संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान जिल्हास् तरीय मूल्यमापन समितीने ५ डिसेंबर रोजी भेट देऊन विकास कामांची पाहणी करून आवश्यक सूचना केल्या. यावेळी मूल्यमापन समिती प्रमुख धुळे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश, प्रकल्प संचालक मोरे, धुळे जिल्हा समाज कल्याण अधिकारी पाटील साहेब, आदर्श ग्राम सरपंच आर.आर. पाटील, जिल्हा समन्वयक दीपक पाटील, बुलडाणा जि.प. उपाध्यक्ष पांडुरंग पाटील खेडेकर, चिखली पं.स. सभापती सत्यभामा डहाके, गटविकास अधिकारी डॉ. रामावत व राजपूत यांच्या गावकर्‍यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यानंतर समितीने दलित वस्तीतील कामे व शाळा, अंगणवाडी येथे भेट दिली. प्रसंगी शाळेमध्ये राबविण्यात आलेल्या विशेष उपक्रमांचे समिती अध्यक्ष देशमुख यांनी कौतुक केले तसेच सूचनाही केल्या. यावेळी सरपंच सुनीता कणखर, उपसरपंच संजय पर्‍हाड, दासा पाटील, संगीता कणखर, गीता कणखर, अर्चना कणखर, अशोक पर्‍हाड, विलास वाघमारे, शेतकरी संघटनेचे समाधान कणखर, सूर्यनारायण कणखर, रवींद्र भगत, विनोद कणखर आदींसह गावकरी उपस्थित होते.

Web Title: Visit of Village Cleanliness Appraisal Committee to Varakhhed