शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
4
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
5
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
6
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
7
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
8
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
9
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
10
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
11
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
12
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
13
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
14
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
15
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
16
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
17
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
18
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
19
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
20
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 

लक्षावधी भाविकांच्या श्रद्धेने फुलली संतनगरी, प्रकटदिन महोत्सव महोत्सवाला भाविकांची मांदियाळी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2018 1:45 PM

गजानन महाराज यांचा १४० वा प्रकट दिन बुधवारी लाखो भाविकांच्या साक्षिने उत्साहात साजरा करण्यात आला.

शेगाव :  'गजानना अवलीया, अवतरले जग ताराया', 'गण गण गणात बोते' च्या गजरात शेगाव येथे संत श्री गजानन महाराज यांचा १४० वा प्रकट दिन बुधवारी लाखो भाविकांच्या साक्षिने उत्साहात साजरा करण्यात आला. यागाची पूर्णाहूती व अवकृतस्नान कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील (व्यवस्थापकीय विश्वस्त, गजानन महाराज संस्थान) यांच्याहस्ते झाली. ह.भ.प. श्रीरामबुवा ठाकूर यांचे सकाळी १० ते १२ किर्तन झाले. याचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. या प्रकटदिनोत्सवाला १ फेब्रुवारीपासून सुरूवात झाली, असून याअंतर्गत दररोज काकडा, भजन, प्रवचन, हरिपाठ, कीर्तन आदी कार्यक्रम सुरू आहेत.  या प्रकट दिनानिमित्त एक फेब्रुवारीपासूनच शेगावात उत्सवाला सुरुवात झाली आहे. दरम्यान या उत्सवात राज्यभरातील तब्बल  एक हजाराच्यावर  दिंड्या शेगावात दाखल झाल्या होत्या. भाविकांचीही मोठी गर्दी सध्या विदर्भपंढरीत होत आहे. दर्शनासाठी भक्तांच्या रांगा लागल्या होत्या. अत्यंत शिस्तीत भक्तांनी श्रींचे दर्शन घेतले. दुपारी १२ वाजता गुलाबपुष्प गुलाल उधळून श्रींचा प्रकट सोहळा भक्तिभावाने साजरा करण्यात आला. यावेळी महारुद्रस्वाहाकार यज्ञाची पूणार्हूती संपन्न झाली. यावेळी संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील, संस्थानचे अध्यक्ष नारायणराव पाटील, कार्यकारी विश्वस्त निळकंठदादा पाटील, रमेश डांगरा, गोविंद कलोरे, अशोकराव देशमुख, किशोर टांक, चंदूलाल अग्रवाल, प्रमोद गणेश आदी उपस्थित होते. संस्थानच्यावतीने २ लाखावर भक्तांना महाप्रसाद वितरण करण्यात आले. नागपूर टिमकी श्रीभक्त मंडळाच्या वतीने वारकºयांचे पादत्राणे विनामुल्य ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली होती. 

श्रींची भव्य नगर परिक्रमाश्रींच्या १४० व्या प्रकटदिनी श्रींच्या पालखीची दुपारी २ वाजता रथ, मेणा, गज अश्वासह  नगर परिक्रमा काढण्यात आली. श्रींची पालखी दत्तमंदिर, हरहर शिवमंदीर श्री शितलनाथ महाराज मंदिर, फुलेनगर श्रींचे पकटस्थळ, श्री मारोती मंदीर बाजार विभाग, बसस्थानक व्यापारपेठ मार्गे श्रींची पालखी काढण्यात आली. शिवमंदीर, श्री प्रकटस्थळ, श्री मारोती मंदीर येथे विश्वस्तांच्याहस्ते पुजा करण्यात आली. यावेळी शहर ठिकठिकाणी भक्तांच्या वतीने चहा, नाश्टा, फराळ, व महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. अनेकांनी श्रींच्या पालखीवर पुष्पवृष्टी केली. प्रकट दिनानिमित्त भाविकांची झालेली गर्दी पाहता पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवला.  वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून पार्किंग व्यवस्थाही शहरात ठिकठिकाणी कर्म्याट आली होती. दिंड्यांच्या आगमनामुळे विदर्भपंढरीत भक्तीमय वातावरण झाले होते.