मतदानावर बहिष्काराचा इशारा

By Admin | Updated: September 18, 2014 00:45 IST2014-09-18T00:45:49+5:302014-09-18T00:45:49+5:30

सिंदखेडराजा तालुक्यातील शेतक-यांची गारपीटग्रस्तासाठी मदतीची मागणी.

Violence against voting | मतदानावर बहिष्काराचा इशारा

मतदानावर बहिष्काराचा इशारा

सिंदखेडराजा : फेब्रुवारी व मार्च २0१४ मध्ये सिंदखेडराजा तालुक्यामध्ये झालेल्या गारपीटग्रस्त पावसामुळे शेतकर्‍यांच्या तोंडाशी आलेला घास मातीत मिसळला. गहू, शाळू, कांदा, द्राक्ष, मोसंबी, फळबागाचे करोडो रुपयांचे नुकसान झाले. शासनाने मदतही जाहीर केली. परंतु सात महिने उलटले तरीही सहा हजार शेतकरी मदतीपासून वंचीत आहेत. त्यांना त्वरीत मदत द्यावी, अन्यथा विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा शेतकरी संघटनेचे रमेश पागोरे, बद्रीनाथ बुधवत, रन्नु, चौधरी, जे.के.खरात, सुरेश खरात यांचेसह भाराकाँचे शिवदास रिंढे, बद्री वाघ, राजेंद्र कांगणे, दामु बंगाळे यांचेसह असंख्य शेतकर्‍यांनी निवेदनाद्वारे उपविभागीय अधिकारी डॉ.घोडके व तहसिलदार कणसे यांना दिला. जर पंधरा दिवसाचे आत शेतकर्‍यांना मदत न मिळाल्यास मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला.
५ हजार ८७४ शेतकरी मदतीपासून वंचीतगारपीट व अतवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतीचा तलाठी व कृषी पर्यवेक्षकांच्या माध्यमातून सर्वे करण्यात आला होता. त्यामध्ये ८१ गावातील ३१८२४ शेतकर्‍यांना २१ कोटी ५२ लाख ३९ हजार ५00 रुपयांची मदत शासनाने पाठविली. आलेली मदत गावातील शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी तलाठय़ामार्फत प्रत्येक शेतकर्‍यांचे बँक खाते नंबर जमा करण्याचे आदेश तहसिलदारांनी तलाठय़ांना दिले होते. आजपर्यंत २६ हजार ९५0 शेतकर्‍यांना १९ कोटी रुपयांचे वाटप बँकेच्या माध्यमातुन करण्यात आले. तरीही ५८७४ शेतकरी मदतीपासून वंचीत आहेत. यातील असंख्य शेतकर्‍यांनी बँक खात्याचे नंबर तलाठी व संबंधीत यंत्रणेकडे ३ ते ४ वेळेस येऊन सुद्धा पाच हजार शेतकरी गेल्या सहा महिन्यापासून तहसिलमध्ये दररोज येरझारा मारतात.

Web Title: Violence against voting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.