बाेकड चाेरणाऱ्यास ग्रामस्थांनी दिला चाेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:22 IST2021-06-27T04:22:53+5:302021-06-27T04:22:53+5:30

बुलडाणा-औरंगाबाद रोडवरील जांब या ठिकाणी साबीर सरदार पठाण यांचे टायर पंक्चर दुरुस्ती दुकान आहे़ २४ जून रोजी रात्री रोडवर ...

The villagers gave chape to the back thief | बाेकड चाेरणाऱ्यास ग्रामस्थांनी दिला चाेप

बाेकड चाेरणाऱ्यास ग्रामस्थांनी दिला चाेप

बुलडाणा-औरंगाबाद रोडवरील जांब या ठिकाणी साबीर सरदार पठाण यांचे टायर पंक्चर दुरुस्ती दुकान आहे़ २४ जून रोजी रात्री रोडवर त्यांच्या दुकानाजवळ एक मालवाहतूक करणारे वाहन थांबले़ वाहनांच्या टायरमध्ये हवा भरणे चालू असताना यातील वाहनचालक व मालक सै. समीर सै. सगीर रा. बैलबाजार शहापुरा (म. प्रदेश) याने दुकानदाराचे लक्ष नसल्याचे पाहून तेथे असलेल्या बोकडास आपल्या वाहनात टाकून घटनास्थळावरून पोबारा केला़ दरम्यान, ही बाब दुकानदार साबीर सरदार पठाण यांच्या लक्षात आली असता त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने त्या चोरट्यांचा पाठलाग केला़ धाडमध्ये त्यांना पकडून नागरिकांनी चोरट्यांना चांगलाच चोप दिला़ तसेच चोरट्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यासाठी जात असताना वाहनचालकाने तेथून पळ काढला. या प्रकरणी दुकानदाराने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी वाहनमालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील फरार आरोपीचा धाड पोलीस शोध घेत आहेत.

Web Title: The villagers gave chape to the back thief