गावठी दारूची वाहतूक करणाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:34 IST2021-04-27T04:34:52+5:302021-04-27T04:34:52+5:30
एक इसम करवड येथून खामखेड शेलोडी रस्त्याने दुचाकीवर गावठी हातभट्टी दारू विक्रीसाठी विनापरवाना घेऊन जात असल्याची माहिती अमडापूर पाेलिसांना ...

गावठी दारूची वाहतूक करणाऱ्यास अटक
एक इसम करवड येथून खामखेड शेलोडी रस्त्याने दुचाकीवर गावठी हातभट्टी दारू विक्रीसाठी विनापरवाना घेऊन जात असल्याची माहिती अमडापूर पाेलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोहेकाॅ. दिलीप तोंडे, पोकाॅ. राहुल इंगळे यांनी खामखेड टी. पॉइंटवर सापळा रचून आरोपी मनोहर खिमराज चव्हाण रा. करवंड याची झडती घेतली़ त्याच्या दुचाकी क्र. एमएच २८ बीजे ७६३७ वर गावठी दारू घेऊन जात असल्याचे आढळला. पाेलिसांनी त्याच्याकडून २० लीटर हातभट्टीची दारू किंमत २१०० रुपये, माेबाइल किंमत ५ हजार व दुचाकी किंमत ५२ हजार असा ५९ हजार १०० रुपयांचा ऐवज जप्त केला़ तसेच आराेपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक केली. संचारबंदीच्या काळातही गावठी दारूची विक्री हाेत असल्याचे चित्र आहे.