शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
4
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
6
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
7
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
8
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
9
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
10
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
11
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
12
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
13
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
14
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
15
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
16
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
17
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
18
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
19
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
20
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका

vidhan sabha 2019 : कोणाला बसणार हादरे; राजकीय गणितांना वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 2:26 PM

युतीचा गुंता न सुटल्याने राजकीय महत्त्वाकांक्षा वृद्धींगत झालेल्या अनेक इच्छुकांची चलबिचल सुरू आहे.

- नीलेश जोशी लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात मतदारांनी प्रस्थापितांना नाकारत सात मतदारसंघापैकी तीन मतदारसंघात नव्या चेहऱ्यांना संधी दिली होती. त्या पृष्ठभूमीवर येत्या विधानसभा निवडणुकीत कोणाला ‘हादरे’ बसतात तर कोणाला पुन्हा ‘संधी’ मिळते याबाबत सध्या राजकीय वर्तुळात गणिते मांडली जात आहेत. त्यातच युतीमधील वाढता गुंता पाहता जागा वाटपाच्या निर्णायक क्षण येण्यास अद्यापही दोन ते तीन दिवसांचा अवकाश आहे. त्यामुळे काही इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे.सध्या भाजप, शिवसेना या पक्षांची चांगलीच चलती असल्याने या दोन्ही पक्षातील इच्छुकांच्या महत्त्वाकांक्षा वाढल्या आहेत. त्यामुळेच जिल्ह्यातील सात विधानसभांसाठी भाजपने घेतलेल्या मुलाखतीसाठी तब्बल ६४ जणांनी हजेरी लावली होती. एकट्या बुलडाणा विधानसभा मतदारसंघातून नऊ जण इच्छूक होते तर सिंदखेड राजा व चिखलीतूनही अनेक जण इच्छूक होते. शिवसेनेचा विचार करता एकट्या बुलडाण्यासाठी तब्बल ३२ जणांनी मुंबईतील शिवसेना भवनाची पायरी चढून मुलाखतीची तयारी पूर्ण केली होती. अगदी चिखली विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या काही इच्छुकांनही बुलडाण्यासाठी मुलाखती दिल्या होत्या. मात्र अद्याप युतीचा गुंता न सुटल्याने राजकीय महत्त्वाकांक्षा वृद्धींगत झालेल्या अनेक इच्छुकांची चलबिचल सुरू आहे.भाजपच्या दृष्टीने खामगाव, मलकापूर आणि जळगाव जामोदमधील उमेदवार निश्चत असून गेल्या पाच वर्षाच्या काळात विद्यमान आमदारांनी आपला प्रभाव कायम ठेवल्याचे दिसून आले आहे.त्यातच लोकसभा निवडणुकीमध्ये खामगाव आणि जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात युतीच्या उमेदवाराला मिळालेले ३३ हजार २७९ आणि ३६ हजार ९८४ मताधिक्य हे जमेची बाजू ठरणारे आहे.दरम्यान, गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे विजयराज शिंदे, काँग्रेसचे दिलीपकुमार सानंदा, ध्रृपदराव सावळे, रेखाताई खेडकर यांना पराभवाचे हादरे बसले होते तर खामगावात अ‍ॅड. आकाश फुंडकर, बुलडाण्यात हर्षवर्धन सपकाळ आणि सिंदखेड राजामध्ये डॉ. शशिकांत खेडेकर या नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली होती.ही स्थिती पहता १४ व्या विधानसभा निवडणुकीत कोणाला हादरे बसतात आणि कोणाला संधी मिळते हे पाहणे उत्सूकतेचे ठरणार आहे. काहीजण ‘वंचीत’च्या उंबरठ्यावर असल्याचीही जिल्ह्यात चर्चा आहे.

यंदा निवडणुकीच्या रिंगणात किती उमेदवार१४ व्या विधानसभा निवडणुकीची लगबग सुरू झालेली आहे. अनेकांच्या महत्त्वाकांक्षा उंचावलेल्या आहेत. त्या पृष्ठभूमीवर १४ वी विधानसभा जिल्ह्यात काही नवी समिकरणे निर्माण करते की काय? याबाबत चर्चांना उधाण आले आहे. त्यातच १२ व्या विधानसभा निवडणुकीत बुलडाणा जिल्ह्यातील सातही मतदारसंघात ८५ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. तर २०१४ च्या निवडणुकीत १०१ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. यापैकी ८१ जणांची अनामत रक्कम जप्त झाली होती. २०१९ ची निवडणूकही विविध कारणांनी अभूतपूर्व ठरणार आहे. त्यामुळे १४ विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर जिल्ह्यात कोणती समिकरणे उदयास येतात याचा अंदाज बांधणे सध्या तरी कठणी आहे. मात्र निवडणुक रिंगणातील उमेदवारांचे यंदा पुन्हा शतक गाठल्या जाण्याची शक्यता आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाPoliticsराजकारणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019