शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

Video: यंदा कमी पावसाची शक्यता, नैसर्गिक आपत्तीचेही संकट, भेंडवळची भविष्यवाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2019 07:30 IST

संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेली आणि सुमारे साडे तीनशे वर्षाची परंपरा लाभलेली बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुकामध्ये वसलेल्या भेंडवळ घटमांडणीची भविष्यवाणी आज आठ मे रोजी पहाटे सहा वाजता जाहीर झाली

भेंडवळ - संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेली आणि सुमारे साडे तीनशे वर्षाची परंपरा लाभलेली बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुकामध्ये वसलेल्या भेंडवळ घटमांडणीची भविष्यवाणी आज आठ मे रोजी पहाटे सहा वाजता जाहीर झाली. यामध्ये नैसर्गिक संकटांची सरबत्ती, पाऊस कमी तर पिके सर्वसाधारण सांगितले असल्याने शेतकऱ्यांना यंदा फारशी चांगली भविष्यवाणी नसल्याचे दिसून आले. 

पिक परिस्थिती सर्वसाधारण सांगितले असून पाऊसही सर्वसाधारण आणि लहरी स्वरूपाचा सांगितलेला आहे. पावसाची परिस्थिती पाहता जून महिन्यामध्ये साधारण पाऊस राहील. पहिला महिना साधारण पाऊस, कुठे कमी, कुठे जास्त..सार्वत्रिक पाऊस होणार नाही. दुसरा महिना चांगला पाऊस होईल. तिसरा महिना कमी जास्त पाऊस होईल, मात्र पहिल्या महिन्याच्या तुलनेत नक्कीच जास्त पाऊस पडेल. चौथा महिना मात्र लहरी स्वरुपाच्या पावसाचा राहील. यावर्षी अवकाळी पाऊस पडणे शक्य आहे. त्याचबरोबर कापूस, तूर, उडीद, मूग, गहू, हरभरा, इत्यादी पिके घेण्याचे सांगितले.  त्यापैकी तूर आणि ज्वारी पिके चांगली येतील असा अंदाज आहे. 

गटातील चारा-पाण्याची प्रतीक असलेली चांडोली कोरडी गायब आहे. त्यामुळे भीषण चारा टंचाई यावर्षी होणार आहे. तरी शेतकऱ्यांनी गुराढोरांचे नियोजन करण्याचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर गटातील घागरीवर असलेली पुरी गायब आहे त्याचा अर्थ पृथ्वीवर अनेक संकटे येतील, सागरी किनारपट्टीवर संकटं येऊ शकतात, भूकंपासारखी आपत्तीही शक्य. चारा-पाण्याची टंचाई येईल तसेच आर्थिक व्यवस्थेचे प्रतीक असलेली करंजी फुटलेली आहे म्हणजेच अर्थव्यवस्था डगमगेल आर्थिक ताण देशावर येईल. परकीय घुसखोरी होत राहणार. मात्र, भारतीय संरक्षण भक्कम राहून चोख प्रतिउत्तर देईल. परंतु त्याला मात्र आपले संरक्षण खाते चोख प्रत्युत्तर देईल तर राजकीय भविष्यवाणीमध्ये राजाची गादी आणि राजा कायम असून पुन्हा एकदा देशाला स्थिर तेचे संकेत दिले आहेत. अशा प्रकारे एकंदर आजची भविष्यवाणी चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज वाघ यांनी वर्तविली आहे. ही भविष्यवाणी ऐकण्यासाठी मलकापूरचे आमदार चैनसुख संचेती यांच्यासह लोकप्रतिनिधीसह पंचक्रोशीतून हजारो शेतकरी येथे उपस्थित होते.

टॅग्स :buldhanaबुलडाणाRainपाऊस