बुलडाणा जिल्ह्यातील वीरपत्नींचा होणार गौरव

By Admin | Updated: July 28, 2014 00:13 IST2014-07-28T00:12:42+5:302014-07-28T00:13:05+5:30

३ ऑगस्ट रोजी आयोजन : वीर जवानांना महाराष्ट्राचा सलाम.

Veerpattanees in Buldana district will be honored | बुलडाणा जिल्ह्यातील वीरपत्नींचा होणार गौरव

बुलडाणा जिल्ह्यातील वीरपत्नींचा होणार गौरव

सिध्दार्थ आराख / बुलडाणा
जमाने भर मे मिलते है
आशिक कई।
मगर वतनसे खुबसुरत कोई
सनम नही ।
नोटो मे भी लिपटकर,
सोने मे सिमटकर मरे है कई ।
मगर तिरंगे से खुबसुरत
कोई कफन नही ।
ऊन, थंडी, वारा, पावसाची पर्वा न करता डोळ्यात तेल घालून देशाच्या सिमेवर मातृभूमिचे रक्षण करताना शूरविरांच्या वाट्याला अनेकदा तिरंग्याचे कफन येते. महाराष्ट्रातील अशा ५ सुपूत्रांना २0१३ च्या ऑपरेशन रक्षक व ऑपरेशन हिफाजतमध्ये विरगती प्राप्त झाली. त्यांच्या शौर्याला, कर्तृत्वाला सलाम म्हणून या शहिदांच्या विरपत्नी आणि विरमाता-पित्यांचा सन्मान महाराष्ट्र सरकारच्या वतीने ३ ऑगस्ट रोजी रत्नागिरी येथे करण्यात येत आहे.
कारगिल युध्दानंतरही पाकिस्तानी घुसखोरांच्या छुप्या कारवाया सिमेवर नेहमीच सुरू असतात. भारतीय सैन्य त्यांना तोडीस तोड उत्तर देते. गतवर्षी घुसखोरांना तोंड देण्यासाठी, भारतीय सैन्यास जम्मू काश्मिरमध्ये ऑपरेशन रक्षक, हिमाचलमध्ये ऑपरेशन फाल्कोन आणि मणिपूरमध्ये ऑपरेशन हिफाजत राबवावे लागले. या चारही ऑपरेशनमध्ये भारतीय सैन्य दलाने आपले कर्तृत्व दाखवून दिले. या मोहिमांमध्ये महाराष्ट्राच्या ५ सुपूत्रांना विरगती प्राप्त झाली. त्यांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्यावतीने रत्नागिरी येथे आयोजित एका समारंभात शहिदांच्या विरपत्नींना ताम्रपट व रोख रक्कम देवून त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
राज्याचे सैनिक कल्याण मंत्री उदय सामंत व सैन्यदलातील वरिष्ठ अधिकार्‍यांच्या उपस्थितीत विरपत्नींना ३ लाख रुपये रोख व ताम्रपट, माता पित्यांना प्रत्येकी १ लाख रुपये तर अपंगत्व प्राप्त झालेल्या दोन सैनिकांना ताम्रपट व प्रत्येकी १ लाख रुपये, तसेच सैन्यदलात विविध मानाची पदके प्राप्त केलेल्या अधिकार्‍यांना यावेळी महाराष्ट्र गौरव पुरस्कार व रोख रक्कम देवून सन्मानीत करण्यात येणार आहे. यापूर्वि २0१0ला हा कार्यक्रम बुलडाणा येथे घेण्यात आला होता.

या वीरपत्नींचा होणार ताम्रपटाने सत्कार

ऑपरेशन रक्षक, जम्मू काश्मिर
१. नायक पुंडलीक केरबा माने, मु. पिंपळगाव बु., ता. भागल, जि.कोल्हापूर. (विरपत्नी राजश्री माने)
२. सत्ताप्पा महादेव पाटील, मु. बेलवाडी मसा, ता. कागल, जि.कोल्हापूर. (श्रीमती अश्‍विनी पाटील)
३. महेश व्यंकट धायगुडे, मु.पाडळी, ता.खंडाळा, जि.सातारा. (विरपत्नी संगिता महेश धायगुडे)
ऑपरेशन फाल्कोन
४.सुभेदार राजेंद्र शिवाजी बागणे, मु. सोनी, ता.मिरज, जि. सांगली. (विरपत्नी अनिता राजेंद्र बागणे) गावांना

Web Title: Veerpattanees in Buldana district will be honored

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.