शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
3
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
4
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
5
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
6
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
7
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
9
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
10
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
11
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
12
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
13
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
14
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
15
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
16
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
17
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
18
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
19
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
20
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 

विविध राजकीय पक्षांचा एसटी कर्मचारी संपास पाठींबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 1:31 PM

चिखली : सातवा वेतन आयोग लागु करावा यासह विविध न्याय मागण्यांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाºयांनी १६ आॅक्टोंबर च्या मध्यरात्री पासून पुकारलेल्या संपास विविध राजकीय पक्षांनी आपला पाठींबा दर्शविला असून या स्थानिक चिखली आगारातील संपकरी कर्मचाºयांची भेट घेवून शासनाने त्यांच्या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्यात व कर्मचाºयांसह प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी ...

चिखली : सातवा वेतन आयोग लागु करावा यासह विविध न्याय मागण्यांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाºयांनी १६ आॅक्टोंबर च्या मध्यरात्री पासून पुकारलेल्या संपास विविध राजकीय पक्षांनी आपला पाठींबा दर्शविला असून या स्थानिक चिखली आगारातील संपकरी कर्मचाºयांची भेट घेवून शासनाने त्यांच्या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्यात व कर्मचाºयांसह प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटना येथील आगरात संप पुकारलेल्या एस.टी.कामगारांची स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांनी १८ आॅक्टोबर रोजी भेट घेवून एस.टी.कर्मचाºयांचे प्रश्न जाणून घेतले. दरम्यान सरकारने एस.टी.कर्मचाºयांचे प्रश्न तात्काळ सोडवावे अन्यथा जनता सरकारच्या अंगावर जाईल, असा ईशारा तुपकरांनी यावेळी दिला. तसेच भाजपा सरकार अपयशी असल्याची टिका करून सरकारमधील मंत्र्यांचे बेताल वक्तव्य ही सरकारची मुजोरी असल्याचे स्पष्ट करून एस.टी. कर्मचाºयांच्या भावना समजून घेत तातडीने तडजोड करणे अपेक्षीत होते मात्र, तसे झाले नसल्याने या संपास रविकांत तुपकर यांनी पाठींबा जाहीर केला. यावेळी संघटनेचे तालुकाध्यक्ष भारत वाघमारे, नितीन राजपूत, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष शेख मुख्तार, संतोष राजपूत, चिखली संपर्क प्रमुख शाम अवतळे, जालना जिल्हाध्यक्ष मयूर बोर्डे, विद्यार्थी संघटनेचे जिल्हा प्रमुख पवन देशमुख, तालुकाध्यक्ष राम अंभोरे, अनिल वाकोडे, छोटू झगरे, रामेश्वर परिहार  आदी उपस्थित होते.

जिल्हा काँग्रेस कमिटी स्थानिक चिखली आगारातील दत्त मंदिर परीसरात आगारातील सर्व कर्मचाºयांनी संप पुकारून ठिय्या मांडला आहे. या संपकरी कर्मचाºयांची १८ आॅक्टोबर रोजी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार राहुल बोंद्रे यांनी भेट घेवून या आंदोलनास काँग्रेस पक्षाचा पाठींबा जाहीर केला व शासनाने तातडीने कर्मचाºयांच्या मागण्यांची पुर्तता करावी अशी मागणी केली. यावेळी काँग्रेस नेते प्रा.नरेंद्र खेडेकर, बाजार समितीचे सभापती डॉ़ सत्येंद्र भुसारी, समाधान सुपेकर, बाळु महाजन, तुषार भावसार, विलास चव्हाण आदी उपस्थित होते. दरम्यान शासनाच्या हेकेखोरपणामुळे ऐन दिवाळीत प्रवाशांचे हाल होत आहेत, एस़टी. कर्मचाºयांनी वेळोवेळी केलेल्या मागण्यांकडे सरकारने जाणीवपुर्वक दुर्लक्ष केल्याने ही वेळ राज्यातील नागरीकांवर व प्रवाशांवर आली आहे, सरकारचा नाकर्तेपणा व हुकुमशाही वृत्तीच याला कारणीभूत असल्याचे परखड मत यावेळी आ.राहुल बोंद्रे यांनी व्यक्त केले़ 

रासप व राजपूत युवा मंच महाराष्टÑ एस.टी.कर्मचारी आयोग संयुक्त कृती समितीने पुकारलेल्या बेमुदत संपास राष्टÑीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा राजपूत युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष सुभाषसिंह राजपूत यांनी पाठींबा जाहीर केला असून चिखली आगरातील संपकरी कर्मचाºयांची भेट घेवून त्यांच्या मागण्या व समस्या जाणून घेत स्वत:चा जीव धोक्यात घालून अहोरात्र जनतेची सेवा करणाºया कर्मचाºयांच्या श्रमाचे योग्य मूल्य देण्याबाबत सरकार वेळकाढू धोरण अवलंबत असल्याने ही परिस्थिती उद्भवली असून ही परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी सरकारने कर्मचाºयांच्या मागण्यांची पूर्तता करावी, अशी मागणी सुभाषसिंह राजपूत यांनी यावेळी केली. (तालुका प्रतिनिधी)

टॅग्स :agitationआंदोलन