देशाला एकसंघ ठेवण्यासाठी वल्लभभाई पटेल यांचे योगदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2016 00:25 IST2016-11-01T00:25:45+5:302016-11-01T00:25:45+5:30

एकनाथ खडसे यांचे प्रतिपादन; मलकापूर येथे सरदार पटेल यांचा जयंती उत्सव थाटात

Vallabhbhai Patel's contribution to keep the country together | देशाला एकसंघ ठेवण्यासाठी वल्लभभाई पटेल यांचे योगदान

देशाला एकसंघ ठेवण्यासाठी वल्लभभाई पटेल यांचे योगदान

मलकापूर, दि. ३१-स्वातंत्र्य प्राप्तीनंतर देशाला एकसंघ ठेवण्यात स्व. सरदार वल्लभभाई पटेल यांचे मोलाचे योगदान असून, त्यांचा वारसा जपणार्‍या लेवा पाटील समाजाने त्यांच्या कार्य व कर्तृत्वाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवण्याचे आवाहन माजी मंत्री आ.एकनाथराव खडसे यांनी केले. ते मलकापूर येथे आयोजित भारतरत्न लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्सव सोहळ्यात बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर खा. रक्षाताई खडसे, आ.हरीभाऊ जावळे, आ.राजुमामा भोळे, माजी खा. उल्हासराव पाटील, आ.चैनसुख संचेती, उत्सव समितीचे संयोजक डॉ.अरविंद कोलते आदिंच्या हस्ते वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी माजी खा. उल्हासराव पाटील, आ.हरीभाऊ जावळे, यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी जयंती उत्सव समितीच्यावतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली.

Web Title: Vallabhbhai Patel's contribution to keep the country together

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.