लस हाच उपाय; लसीकरणानंतर जिल्ह्यात एकही मृत्यू नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:35 IST2021-04-24T04:35:16+5:302021-04-24T04:35:16+5:30

बुलडाणा : वाढता काेराेना संसर्ग राेखण्यासाठी देशभरात लसीकरण सुरू करण्यात आले आहे़ लसीकरणाचे फायदे आता दिसून येत असून ...

The vaccine is the solution; There were no deaths in the district after vaccination | लस हाच उपाय; लसीकरणानंतर जिल्ह्यात एकही मृत्यू नाही

लस हाच उपाय; लसीकरणानंतर जिल्ह्यात एकही मृत्यू नाही

बुलडाणा : वाढता काेराेना संसर्ग राेखण्यासाठी देशभरात लसीकरण सुरू करण्यात आले आहे़ लसीकरणाचे फायदे आता दिसून येत असून जिल्ह्यात लसीकरण झालेल्या एकाही नागरिकाचा मृत्यू झाला नाही़ तसेच लसीकरण झालेल्यांपैकी केवळ ००़४ टक्के नागरिकांनाच काेराेना झाला आहे़ त्यांनाही साैम्य लक्षणे असल्याने काेराेनावर लस हाच उपाय असल्याचे समाेर आले आहे़ जिल्ह्यात जानेवारी महिन्यापासून काेराेना रुग्णांची संख्या वाढत आहे़ मार्च व एप्रिल महिन्यात काेराेनाचा कहर सुरू झाला आहे़ काेराेना संसर्ग राेखण्यासाठी देशपातळीवर विविध उपाययाेजना करण्यात येत आहे़ काेराेनाचा प्रभाव कमी करण्यासाठी काेविशिल्ड आणि काेवॅक्सिनचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे़ पहिला डाेस दिल्यानंतर २८ दिवसानंतर रुग्णांना दुसरा डाेस देण्यात येत आहे़ दाेन्हीही डाेस घेतल्यानंतर साधारणात: २८ ते ३० दिवसानंतर शरीरामध्ये ॲण्टीबाॅडी तयार हाेतात़ त्यामुळे, काेराेना हाेण्याची शक्यता कमी हाेते़ तसेच झाला तरी त्याचा प्रभाव फारसा हाेत नसल्याचे चित्र जिल्ह्यात आहे़ जिल्ह्यात आतापर्यंत लस घेतलेल्या एकाही रुग्णांचा काेराेनामुळे मृत्यू झालेला नाही़ त्यामुळे, काेराेनावर लसीकरण प्रभावी ठरत असल्याचे दिलासादायक चित्र आहे़

पहिल्या डाेसनंतर पाच टक्के पाॅझिटिव्ह

पहिला डाेस घेतल्यानंतर पाच टक्के लाेकांना काेराेनाची लागण झाली हाेती़ यामध्ये सुरुवातीच्या काळात फ्रंटलाइन वर्करची त्यातही आराेग्य कर्मचाऱ्यांची संख्या जास्त हाेती़

पहिला डाेस घेतल्यानंतर २८ दिवसांनी दुसरा डाेस घ्यावा लागताे़ दुसरा डाेस घेतल्यानंतर २८ दिवसांनी ॲण्टीबाॅडीज तयार हाेतात़

दाेन्ही डाेस घेतल्यानंतरही मास्कचा वापर, फिजिकल डिस्टन्सिंग तसेच वारंवार हात धुणे आदी नियमांचे पालन करावे लागते़

लसीमुळे रुग्ण गंभीर हाेत नाही.

लसीकरणामुळे नागरिकांच्या शरीरात ॲण्टीबाॅडीज तयार हाेतात़ त्यामुळे काेराेना झाला तरी त्याचा प्रभाव कमी हाेताे़ रुग्ण गंभीर स्थितीत पाेहाेचत नाही़ अनेक रुग्ण डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार घरीच उपचार घेऊ शकतात़ रुग्ण गंभीर हाेत नसल्याने मृत्यूचा प्रश्नच येत नाही़

दाेन्ही डाेस नंतर केवळ ००़४ टक्के पाॅझिटिव्ह

जिल्ह्यात १६ जानेवारीपासून सुरू झालेली लसीकरण माेहीम वेगाने सुरू आहे़ आधी फ्रंटलाइन वर्कर व त्यानंतर सर्वसामान्यांना लस देण्यात येत आहे़ दाेन्ही लस घेतलेल्या केवळ ००़४ टक्के लाेकांनाच काेराेना संसर्ग झाल्याचे चित्र आहे़ यापैकी अनेकांना साैम्य लक्षणे आहेत़ त्यामुळे, डाॅक्टरांच्या मार्गदर्शनात घरीच उपचार घेत आहेत़ त्यामुळे, नागरिकांनी लस घेण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे़

काेराेनावरील लस पूर्णपणे सुरक्षित आहेत़ लसीमुळे रुग्णाची राेगप्रतिकार शक्ती वाढत असल्याने काेराेनाचा प्रभाव कमी हाेताे़ रुग्ण गंभीर स्थितीत पाेहचत नसल्याने जिल्ह्यात आतापर्यंत लस घेतलेल्या एकाही नागरिकाचा काेराेनामुळे मृत्यू झालेला नाही़ त्यामुळे, सर्वांनी लस घेण्यासाठी पुढाकार घ्यावा़

डाॅ़ नितीन तडस, जिल्हा शल्यचिकित्सक, बुलडाणा

Web Title: The vaccine is the solution; There were no deaths in the district after vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.