शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
3
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
4
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
5
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
6
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
7
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
8
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
9
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
10
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
11
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
12
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
13
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
14
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
15
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
16
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
17
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
18
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
19
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
20
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर

बुलडाणा जिल्ह्यात लसीचा तुटवडा, बंद केंद्राची संख्या गुलदस्त्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 10:57 AM

Corona Vaccination : तुटवडा निर्माण झालेल्याने जिल्ह्यातील अनेक लसीकरण केंद्रावरील लस देण्याची मोहीम ठप्प झाली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता लसीकरणाचा वेगही वाढला होता. परंतू गेल्या चार ते पाच दिवसांपासून जिल्ह्यात लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. ११ एप्रिल रोजी सकाळपर्यंत केवळ ९ हजार डोस जिल्ह्यात उपलब्ध होते. लसीअभावी अनेक केंद्र बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांना लस न देताच परत पाठवले जात आहे. जिल्ह्यात लसीचे संकट असतानाही बंद केंद्राची संख्या आरोग्य विभागाकडून गुलदस्त्यात ठेवण्यात येत आहे.ज्याठिकाणी लसीकरण सुरू आहे, त्याठिकाणच्या केंद्रातही मोठी गर्दी होत आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून लसीकरणासाठी येणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या वाढली आहे. परंतू लसीचा तुटवडा निर्माण झालेल्याने जिल्ह्यातील अनेक लसीकरण केंद्रावरील लस देण्याची मोहीम ठप्प झाली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय याठिकाणचे लसीकरण बंद करण्यात आले आहे. जिल्ह्यातील किती केंद्र बंद झाले याची माहिती जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडे उपलब्ध नाही. परंतू अगदी बोटारव मोजण्याइतक्याच ठिकाणी लसीकरण सुरू आहे. रविवारी सकाळी नऊ हजार डोस उपलब्ध होते. त्यामुळे सोमवारपर्यंत साधारणत: लसीकरण सुरू राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाCorona vaccineकोरोनाची लस