हिवरा साबळे येथे ४६ जणांना दिली लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:28 IST2021-05-03T04:28:34+5:302021-05-03T04:28:34+5:30

तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. यावेळी सरपंच प्रवीण काठोळे व प्राथमिक आरोग्य ...

Vaccination given to 46 people at Hiwara Sable | हिवरा साबळे येथे ४६ जणांना दिली लस

हिवरा साबळे येथे ४६ जणांना दिली लस

तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. यावेळी सरपंच प्रवीण काठोळे व प्राथमिक आरोग्य केंद्र डोणगाव विभागाचे सीएचओ डाॅ. पाटील, आरोग्य सेवक डाॅ. शिवराम मिटकरी, आरोग्य सेविका बी.एच. केसरकर, ग्रामपंचायत सचिव बी. ई. निकम, तलाठी गणेश बाजड यांनी संत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला हार व पुष्पगुच्छ वाहून पूजन केले. यावेळी मुख्याध्यापक किरण डोंगरदिवे, मुख्याध्यापक सत्यनारायण घेवंदे, स. शिक्षक कंकाळ, जाधव, वाटसर, अंगणवाडी सेविका आशाबाई इरेगावकर, मीनाताई ढेपे, आशा वर्कर सुनीता कटारे, वंदना पवार, ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य व सदस्या, कर्मचारीवर्ग यांनी विशेष सहकार्य केले. यावेळी हिवरा साबळे, रत्नापूर, जवळा येथील ४६ नागरिकांना लस देण्यात आली.

Web Title: Vaccination given to 46 people at Hiwara Sable