शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

सोईच्या बदलीसाठी दिव्यांग प्रमाणपत्राचा आधार    

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 5:26 PM

सोईच्या बदलीसाठी अनेक शिक्षक दिव्यांग प्रमाणपत्राचा आधार घेत असल्याने खºया दिव्यांगावर एकप्रकारे अन्याय होत असल्याचे चित्र आहे. 

- ब्रम्हानंद जाधव

बुलडाणा: जिल्ह्यात प्राथमिक शिक्षकांच्या बदलीचे सत्र सुरू असून, यंदाच्या या बदलीप्रक्रियेत ४० ते ५० टक्क्याच्या जवळपास शिक्षक दिव्यांग आहेत.  सोईच्या बदलीसाठी अनेक शिक्षक दिव्यांग प्रमाणपत्राचा आधार घेत असल्याने खºया दिव्यांगावर एकप्रकारे अन्याय होत असल्याचे चित्र आहे. प्राथमिक शिक्षक बदली प्रक्रिया पारदर्शक व्हावी, यामध्ये कुठलाच गैरप्रकार होऊ नये, यासाठी शिक्षण विभागाकडून बदली प्रक्रियेची संपुर्ण कामे आॅनलाइन करण्यात आली आहेत.  गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषद शिक्षण विभागामध्ये प्राथमिक शिक्षकांच्या बदली प्रक्रियेची कामे सुरू आहेत. ६ जूनपर्यंत जिल्ह्यातील ६ हजार ७७२ शिक्षकांचे शिक्षक बदली पोट्रलवर मॅपिंग करण्यात आले. त्यामधून संवर्ग एक, संवर्ग दोन, संवर्ग तीन व संवर्ग चार अशा चार टप्प्यातील बदलीपात्र शिक्षकांची यादी काढण्यात आली. त्यानंतर बदली पोट्रलवर बदलीपात्र शिक्षकांसाठी ७ जून रोजी सकाळी ७ वाजेपासून आॅनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. बदलीपात्र शिक्षकांमध्ये मराठी माध्यमाचे ९७८ व उर्दू माध्यमाचे ११७ बदलीपात्र शिक्षक निघाले. त्यातील ४० ते ५० टक्के शिक्षक हे दिव्यांग असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. यावर्षी दिव्यांग प्रमाणपत्र अनेक शिक्षकांनी काढलेले आहे. मागील वर्षी बोगस दिव्यांग प्रमाणपत्रावरून काही शिक्षकांनी आवाज उठवला होता. मात्र त्यावर काहीच कार्यवाही झाली नसल्याने बोगस दिव्यांग प्रमाणपत्र काढणाºया शिक्षकांना एकप्रकारे अभयच मिळाले. परिणामस्वरून दिव्यांग शिक्षकांचे प्रमाण यंदा वाढलेले असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.  दिव्यांगाची संख्या गुलदस्त्यातबुलडाणा तालुक्यात बदलीपात्र ८७ शिक्षकांपैकी ३५ शिक्षक दिव्यांग आहेत. तर चिखली तालुक्यात १२० पैकी ५३ शिक्षक दिव्यांग असल्याची माहिती आहे. बदलीपात्र शिक्षकांमध्ये मागील वर्षी पेक्षा यावर्षी किती दिव्यांग वाढले याची संख्या जिल्हा परिषद शिक्षण विभागाने गुलदस्त्यात ठेवली आहे. मात्र दिव्यांगाची संख्या वाढल्याचे सांगण्यात आले आहे.  बदली पात्र शिक्षकांमध्ये दिव्यांगाची संख्या यावर्षी वाढलेली आहे. मात्र शिक्षकांकडून सादर केले जाणारे वैद्यकीय विभागाचे दिव्यांग प्रमाणपत्रच आम्हाला ग्राह्य धारवे लागते. त्यावर कारवाई करण्यासाठी आपल्याकडे तरतूद नाही.- एस. टी. व ऱ्हाडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी, बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणा