अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या कष्टावरही फिरले पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:37 IST2021-03-23T04:37:05+5:302021-03-23T04:37:05+5:30
अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. गतवर्षीदेखील पावसाने तोंडचा घास हिरावला होता. यावर्षी कोरोना संकट असल्याने हाताला काम ...

अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या कष्टावरही फिरले पाणी
अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. गतवर्षीदेखील पावसाने तोंडचा घास हिरावला होता. यावर्षी कोरोना संकट असल्याने हाताला काम नाही. तरीदेखील शेतकऱ्यांनी उसनवारी करत कर्ज काढून पेरणी केली. परंतु पावसाने पिके संकटात सापडल्याने शेतकरी चिंतातुर दिसून येत आहे.
नुकसानाचे तातडीने पंचनामे करा : खेडेकर
देऊळगाव मही व गारखेड परिसरात माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी यांनी नुकसानाची पाहणी केली.
यावेळी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख दीपक बोरकर, तालुकाप्रमुख दादाराव खारडे, डॉ. रामप्रसाद शेळके, पंचायत समिती सदस्य भगवान खंदारे, गजानन घुगे, संदीप राऊत, स्वप्निल शहाणे, तुळशीराम पंडित व शेतकरी बांधव उपस्थित होते. नुकसानाचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करण्यात यावी अशी मागणी माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी यावेळी केली.