शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

 'अनलॉक' मुळे आता लांब पल्ल्याच्या बसेस धावण्याचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2021 11:56 IST

Buldhana News : सोमवारपासून जिल्ह्यातील सात आगारामधून लांब पल्ल्याच्या ४६ बसेसलाही आता ग्रीन सिग्नल देण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंधामुळे एसटीची चाकेही थांबली होती. ७ जूनपासून निर्बंधामध्ये शिथीलता आल्याने आता लालपरीही पूर्ण क्षमतेने धावणार आहे. सोमवारपासून जिल्ह्यातील सात आगारामधून लांब पल्ल्याच्या ४६ बसेसलाही आता ग्रीन सिग्नल देण्यात आला आहे. एसटी महामंडळाच्या बुलडाणा विभागातून लांब व मध्यम लांब पल्ल्याच्या बसेस दिवसाला जवळपास २६ हजार कि.मी. अंतर कापणार आहेत.कोरोना विषाणू संसर्गामूळे लॉकडाऊन करण्यात आल्याने लांब पल्ल्याच्या बसेस बंद करण्यात आल्या होत्या. केवळ जिल्हांतर्गत बसेसच सुरू होत्या. त्यातही २२ प्रवाशी आल्यानंतरच बसे पुढे जात होती. त्यामुळे प्रवाशांनीही बसकडे पाठ फिरवल्याने एसटी महामंडळाला मोठा तोटा सहन करावा लागला. आता कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने जिल्ह्यात बरेच निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. त्यामध्ये एसटी बसही आता पूर्ण क्षमतेने सोडण्यात येणार आहेत. ७ जून पासून लालपरी पुन्हा जोमाने धावणार आहे. जिल्ह्यातून जवळपास सर्वच मार्गावरून बसेस सोडण्यात येणार आहेत. प्रत्येक आगारामधून लांब व मध्यम लांब पल्ल्याच्या बस फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

उभे राहून प्रवास करण्यास मनाईराज्य परिवहन महामंडळच्या बस वाहतूक पूर्ण आसन क्षमतेसह सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र उभे राहून प्रवास करण्यास तिसऱ्या स्तरातील अनलॉक झालेल्या जिल्ह्यात मनाई आहे. आंतरजिल्हा व जिल्ह्याबाहेर प्रवाशी वाहतूक सुरू करण्यात आलेली आहे, त्यामुळे एसटी महामंडळाच्या चालक वाहकांना दिलासा मिळाला आहे.

एका आगाराला दोन ते तीन कोटींचा तोटाआतापर्यंत बसेस बंद असल्याने एका आगाराला जवळपास दोन ते तीन कोटींचा तोटा सहन करावा लागला. कोरोनामुळे दीड महिन्यापासून एसटी महामंडळाच्या बसेस बंद झाल्या होत्या. एकट्या बुलडाणा आगाराला जवळपास चार कोटी रुपयांचा तोटा गेल्या दीड महिन्यात झाला होता.

टॅग्स :buldhanaबुलडाणाstate transportएसटी