शहरं
Join us  
Trending Stories
1
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
2
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
3
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
4
Sharmila Thackeray : "बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
5
"उबाठानं काँग्रेससमोर लोटांगण घातलंय, ते लीन झालेत आणि आता विलीनीकरणही होईल"
6
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
7
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
8
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
9
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
10
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
11
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
12
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
13
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
14
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
15
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
16
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?
17
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
18
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
19
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
20
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले

Unlock Buldhana : मॉल, थिएटर्स व नाट्यगृह सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2021 12:20 PM

Unlock Buldhana : जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी ६ जून रोजी दिलेल्या प्रतिबंधात्मक आदेशानुसार लावण्यात आलेले निर्बंध शिथिल  करण्यात येत  आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा :  राज्यात ४ जून रोजी निर्गमित करण्यात आलेल्या सुधारित आदेशानुसार बुलडाणा जिल्हा आता पहिल्या श्रेणीमध्ये समाविष्ट झाला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी ६ जून रोजी दिलेल्या प्रतिबंधात्मक आदेशानुसार लावण्यात आलेले निर्बंध शिथिल  करण्यात येत  आहेत. पहिल्या टप्प्यात लागू असलेल्या बाबींना १४ जून रोजी सकाळी ७ वाजेपासून ते पुढील आदेशापर्यंत मुभा देण्यात आली आहे.  त्यामुळे मॉल, थिएटर्स, नाट्यगृहे ५० टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी राहणार आहे.या आदेशानुसार सर्व अत्यावश्यक सेवेची व अत्यावश्यक सेवा नसलेली दुकाने नियमित सुरू राहतील. मॉल, थिएटर्स व नाट्यगृह एकूण आसन क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेने सुरू राहतील. ज्या खुर्च्यांचा वापर करण्यात येणार नाही, त्या खुर्च्यांवर सेलोटेप, रिबन व स्टिकर लावून त्या वापरात नाही असे दर्शवावे लागणार आहे. कृषी सेवा केंद्र व कृषी निविष्ठांची दुकाने, कृषी प्रक्रिया, उद्योग गृहे, शेती अवजारे व शेतातील उत्पादनाशी निगडीत दुकाने नियमित सुरू राहणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे.दुसरीकडे हॉटेल्स, रेस्टॉरंट व खानावळ नियमितपणे सुरू राहतील. रेस्टॉरंट मध्ये गर्दी होणार नाही, याची काळजी हॉटेल मालकाने घ्यावी. आसने शारीरिक अंतराच्या नियमांचे पालन करून असावी. सार्वजनिक ठिकाणे,  खुले मैदान, फिरणे व सायकलिंगसाठी  परवानगी आहे. क्रीडा स्पर्धा नियमित होतील.  एकाच ठिकाणी गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी लागणार आहे. सर्व केशकर्तनालये, सलून, स्पा, ब्युटी पार्लर नियमित सुरू राहतील. खुर्ची व वापरण्यात येणारे साहित्य निर्जंतुकीकरण करणे बंधनकारक असेल. आंतर जिल्हा व जिल्ह्याबाहेर प्रवासी  वाहतूक सुरू राहील. मात्र, रेड झोन मधील जिल्ह्यात जाणे-येणे होत असल्यास ई-पास आवश्यक राहील.दरम्यान नागरिकांनी त्रिसुचीचे पालन करणे गरजेचे आहे.

टॅग्स :Coronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकbuldhanaबुलडाणा