गर्भगृहात तीन सावल्या पडणारे लोणार सरोवरातील अनोखे मंदिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2020 11:16 AM2020-08-30T11:16:06+5:302020-08-30T11:16:13+5:30

रामगया मंदीराच्या गर्भगृहासमोर उभे राहल्यास थेट गर्भगृहात माणसाच्या तीन सावल्या पडतात.

A unique temple in Lonar Lake with three shadows falling in the sanctum sanctorum | गर्भगृहात तीन सावल्या पडणारे लोणार सरोवरातील अनोखे मंदिर

गर्भगृहात तीन सावल्या पडणारे लोणार सरोवरातील अनोखे मंदिर

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : खाऱ्या पाण्याच्या लोणार सरोवरातील मंदीरे वैशिष्ट्यपूर्ण असून या मंदीरांसोबत काही अख्यायिका जोडल्या गेल्या आहेत. अशाच मंदीरांपैकी एक असलेल्या रामगया मंदीराच्या गर्भगृहासमोर उभे राहल्यास थेट गर्भगृहात माणसाच्या तीन सावल्या पडतात.
शॅडो टेंम्पल संदर्भात जगात अनेक अख्यायिका सांगितल्या जातात. मात्र लोणार सरोवरात उतरल्यानंर ज्या ठिकाणी प्रभु श्रीरामांनी त्यांच्या वडीलांचे श्राद्ध केले होत अशी अख्यायिका आहे त्या झिºयालगतच हे रामगया मंदीर आहे. वैशिष्ट्यपूर्ण बांधणीमुळे हे मंदीर आकर्षक दिसते. मंदीराचे कोरीव काम तथा मंदीर ज्या दगडी खांबावर उभे आहे त्या खांबांमुळे सुर्य किरण छेदल्या जावून गर्भगृहासमोर उभे राहल्यास माणसाच्या तीन सावल्या गर्भगृहात पडतात.
वनवासादरम्यान प्रभु रामचंद्र यांनी लोणार सरोवर परिसरात सव्वा महिना वास्तव्य केल्याची अख्यायिका आहे. त्यामुळे पौराणिक, धार्मिक असे या सरोवर परिसरातील मंदीरांचे महत्त्व आहे. दरम्यान, या मंदीराच्या गर्भगृहासमोर उभे राहल्यास तीन सावल्या पडत होत्या, असे सांगितले जाते. मात्र वर्तमान स्थितीत येथे तीन सावल्या पडत असल्याचे स्पष्ट पणे दिसते. दुसरीकडे लोणार सरोवर परिरातील मंदीरांचे कार्बनीक विश्लेषण केल्यानंतर ही मंदीरे जवळपास दहा हजार वर्षापूर्वीची असल्याचे मध्यंतरी केलेल्या पाहणीत समोर आले होते.

 

Web Title: A unique temple in Lonar Lake with three shadows falling in the sanctum sanctorum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.