बुलडाणा : नांदुरा - भरधाव ट्रकच्या धडकेत पादचारी अज्ञात इसमाचा मृत्यू झाल्याची घटना नांदुरा-खामगाव राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर आबोंडा फाट्या जवळ ४ ऑगस्टचा संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. मृतकाच्या डोक्यावरुन भरधाव ट्रकचे चाक गेल्याने मृतकाची ओळख पटली नव्हती, पोलिसांकडून ओळख पटविण्याचे काम सुरू होते.
याबाबत प्राप्त माहितीनुसार दि.४ ऑगस्टच्या संध्याकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान जी.जे.०४ ए .डब्ल्य. ३६७१ क्रमांकाच्या खामगाव कडून नांदुराकडे येणाऱ्या भरधाव ट्रकने आंबोडा फाट्या जवळ पादचारी अज्ञात इसमाला जोरदार धडक दिली. या अपघातात त्या इसमाचा जागीच मृत्यू झाला. मृतकाच्या डोक्यावरुन टूकाचे चाक गेल्यामुळे जागीच मृत्यू झाला. वृत्त लिहेपर्यंत ओळख पटली नाही. अपघातानंतर जलंब पोलीस दाखल झाले असून वृत्त लिहेपर्यंत गुन्ह्याची नोंद झाली नव्हती.