अज्ञात वाहनाच्या धडकेत अनोळखी इसमाचा मृत्यू
By Admin | Updated: March 18, 2015 23:41 IST2015-03-18T23:41:17+5:302015-03-18T23:41:17+5:30
शेगाव येथील घटना.

अज्ञात वाहनाच्या धडकेत अनोळखी इसमाचा मृत्यू
शेगाव (जि. बुलडाणा) : अज्ञात वाहनाच्या धडकेत अनोळखी इसमाचा मृत्यू झाल्याची घटना शेगाव-बाळापूर मार्गावर १६ मार्च रोजी घडली. शेगाव-बाळापूर मार्गावर १६ मार्च रोजी अज्ञात वाहनचालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव व निष्काळजीपणाने चालवून ५0 वर्षीय इसमास धडक दिली. यामध्ये सदर इसम गंभीर जखमी होऊन जागीच गतप्राण झाला. त्याच्या अंगात निळ्या रंगाचे फुल बाह्याचे शर्ट तसेच आतमध्ये दोन पांढर्या रंगाचे फुल बाह्याचे शर्ट परिधान केले आहेत. वर्ण निमगोरा, चेहरा गोल, उंची १५५ सेमी आहे. सदर अनोळखी इसमाची ओळख पटविण्याचे आवाहन तपास अधिकारी डी. बी. वाघमोडे यांनी केले आहे.