वाहनाच्या धडकेत अनोळखी इसम ठार

By Admin | Updated: January 22, 2016 01:43 IST2016-01-22T01:43:50+5:302016-01-22T01:43:50+5:30

खामगाव- नांदु-यादरम्यान पाला ढाब्यानजीक अपघात.

Unidentified body killed in vehicle crash | वाहनाच्या धडकेत अनोळखी इसम ठार

वाहनाच्या धडकेत अनोळखी इसम ठार

खामगाव : अज्ञात वाहनाच्या धडकेने अनोळखी इसम ठार झाल्याची घटना खामगाव ते नांदुर्‍यादरम्यान पाला ढाब्यानजीक २0 जानेवारीच्या रात्रीदरम्यान घडली. अनोळखी इसम वय अंदाजे ३५ ते ४0 हा २0 जानेवारी रोजी राष्ट्रीय महामार्गाने पायी जात असताना त्याला उपरोक्त ठिकाणी अज्ञात वाहनाने धडक दिली. यामध्ये अनोळखी इसम जागीच ठार झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर जलंब पोलीस स्टेशनचे पोहेकाँ श्याम पवार व पोकाँ संतोष डागोर यांनी घटनास्थळ गाठून शवविच्छेदनासाठी खामगाव येथील सामान्य रुग्णालयात आणले. याप्रकरणी अवतारसिंग चरणसिंग सैनी यांनी जलंब पो.स्टे.ला फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी कलम ३0४ अ, २७९ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Unidentified body killed in vehicle crash